वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

वरोऱ्यात दिवंगत गुरुचरणजी मर्दाने यांच्या जयंतीनिमित्त स्मृती वृक्षारोपण उत्साहात

वरोऱ्यात दिवंगत गुरुचरणजी मर्दाने यांच्या जयंतीनिमित्त स्मृती वृक्षारोपण उत्साहात

वरोरा प्रतिनिधी :
"एक वृक्ष - एक स्मृती - एक हरित भविष्य" या संकल्पनेतून दिवंगत पूज्य गुरुचरणजी अमरनाथजी मर्दाने यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त वरोरा येथील आकाश नगर, मालवीय वार्ड येथे स्मृती वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरोरा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. अर्चनाताई आशिष ठाकरे उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्षा सौ. योगिताताई भारत नेरकर, नगरसेवक बंडूभाऊ देऊळकर तसेच आनंदवनचे कलाशिक्षक प्रल्हादजी ठक सर उपस्थित होते.
यावेळी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. "वृक्ष हेच खरे जीवनाचे आधार आहेत" हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवत मोठ्या संख्येने नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे संचालन श्री. राजेश मर्दाने यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. प्रवीण मुधोळकर यांनी केले.
याप्रसंगी मा. प्राचार्य सेलवटकर सर, प्रकाशजी पोहाणे, अशोक बावणे, नन्नावरे साहेब, देशमुख साहेब, गोल्हर सर, लांडगे साहेब, अमोल देऊळकर, गोपाल पोंदे, तुषार मर्दाने, उमरे साहेब यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
ओशनिक बहुउद्देशीय संस्था, आनंदवन मित्र मंडळ, रेल्वे प्रवासी संघ, आनंदम् मैत्री संघ आणि जय हिंद सैनिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या स्मृती वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संरक्षणासाठी अशा उपक्रमांची आजच्या काळात मोठी गरज असून, वृक्षसंवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
......

Comments