वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

वरोऱ्यात सट्टापट्टी जुगारावर पोलिसांची धाड; एकाविरुद्ध गुन्हा, रोख रकमेसह साहित्य जप्त.

वरोऱ्यात सट्टापट्टी जुगारावर पोलिसांची धाड; एकाविरुद्ध गुन्हा, रोख रकमेसह साहित्य जप्त.

वरोरा : वरोरा पोलिसांनी शहरातील मालवीय वॉर्ड परिसरात सुरू असलेल्या सट्टापट्टी जुगारावर धाड टाकून एका आरोपीविरुद्ध कारवाई केली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 12(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 जून 2026 रोजी सायंकाळी शहरात गस्त घालत असताना रेल्वे स्टेशनसमोरील बजरंग हॉटेलजवळ एक व्यक्ती बोगस आकड्यांवर सट्टापट्टी स्वीकारत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. वरिष्ठांच्या परवानगीनंतर पंचांसमक्ष पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली.

धाडीदरम्यान सट्टा लावण्यासाठी आलेले काही लोक पळून गेले. मात्र, सट्टापट्टी लिहून पैसे स्वीकारत असलेल्या एका व्यक्तीस पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
आरोपीच्या झडतीमध्ये सट्टापट्टीच्या चिठ्ठ्या, एक निळा बॉलपेन आणि सट्टापट्टीच्या व्यवहारातील 1,280 रुपये रोख, असा एकूण 1,290 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सट्टापट्टी चालविण्यासाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

ही कारवाई पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुखराज यादव, पोलीस अंमलदार महेश व इतर पोलिस पथकाने पंचांच्या उपस्थितीत केली. प्रकरणाचा पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.

Comments