वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

रोटरी क्लब वरोरातर्फे पाच ठिकाणी मोफत आरओ वॉटर फिल्टरची भेट.

रोटरी क्लब वरोरातर्फे पाच ठिकाणी मोफत आरओ वॉटर फिल्टरची भेट.

वरोरा : विद्यार्थी आणि नागरिकांना स्वच्छ, शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या सामाजिक उद्देशाने रोटरी क्लब वरोरातर्फे परिसरातील पाच ठिकाणी आरओ वॉटर फिल्टर बसविण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमाचा शुभारंभ सोमवार, दि. २९ जून २०२६ रोजी छत्रपती शिवाजी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, खांबाडा येथे आरओ वॉटर फिल्टरच्या लोकार्पणाने करण्यात आला. रोटरी क्लब वरोराचे अध्यक्ष योगेश डोंगरवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी अभिजीत मणियार, अभिजीत बोथले आणि सुनील आयचीत यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाला विद्यालयाचे प्राचार्य आर. डी. पारोधे, शिक्षक एम. एन. धोटे, व्ही. एस. जुमनाके, टी. एस. पाचभाई, एन. के. खिरटकर तसेच शाळेचे इतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी शाळा प्रशासनाने रोटरी क्लब वरोराच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
छत्रपती शिवाजी विद्यालयासह जिल्हा परिषद शाळा विठ्ठल मंदिर वॉर्ड (वरोरा), जिल्हा परिषद शाळा बोथली, अरविंद विद्या निकेतन (वरोरा) आणि श्री मोठे विठ्ठल मंदिर देवस्थान (वरोरा) अशा एकूण पाच ठिकाणी मोफत आरओ वॉटर फिल्टर बसविण्यात आले आहेत.
या उपक्रमातून रोटरी क्लब वरोराने सामाजिक बांधिलकी जपत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले असून, या उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.

Comments