लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

निवृत्त मुख्याध्यापकांची 9.46 लाखांची ऑनलाइन गुंतवणूक फसवणूक.


निवृत्त मुख्याध्यापकांची 9.46 लाखांची ऑनलाइन गुंतवणूक फसवणूक. 


फेसबुक रिल्सवरील जाहिरातीवर विश्वास ठेवल्याने सायबर ठगांचा डाव यशस्वी; सायबर पोर्टलवर तक्रारीनंतर वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

वरोरा | दि. 18 जुलै 2026

फेसबुक रिल्सवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावाचा वापर करून जास्त परताव्याचे आमिष दाखवत एका निवृत्त मुख्याध्यापकाची तब्बल 9 लाख 46 हजार 220 रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी बलवंत घडले (रा. बोर्डा, ता. वरोरा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 14 ऑक्टोबर 2025 रोजी फेसबुक रिल्स पाहत असताना गुंतवणुकीवर दरमहा 40 ते 80 हजार रुपये परतावा मिळेल, अशी जाहिरात दिसली. त्यामधील लिंकवर माहिती भरल्यानंतर स्वतःला "अयान प्रणव" असे सांगणाऱ्या व्यक्तीने संपर्क साधून प्रथम 22,020 रुपये जॉइनिंग फी भरण्यास सांगितले. त्यानंतर अधिक नफ्याचे आमिष दाखवत विविध टप्प्यांमध्ये 44,200 रुपये तसेच 8,80,000 रुपये RTGS द्वारे वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यास सांगितले.

सदर रक्कम भरल्यानंतर '9 Pro' या अॅपमध्ये गुंतवणूक आणि नफा दिसत होता. मात्र 19 नोव्हेंबर 2025 रोजी पैसे काढण्याचा (विड्रॉल) प्रयत्न केला असता तो नाकारण्यात आला आणि दुसऱ्याच दिवशी खात्यातील संपूर्ण शिल्लक शून्य दाखविण्यात आली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने 29 जानेवारी 2026 रोजी राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टलवर तक्रार दाखल केली होती. मात्र रक्कम परत न मिळाल्याने अखेर वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.

पोलीसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 318(4) (फसवणूक) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000 चे कलम 66(C) व 66(D) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.

........


जय जगन्नाथ भजन मंडळ, महालगाव (बु.) यांना मा. आमदार श्री. करण संजय देवतळे यांनी भजन मंडळाला हार्मोनियम, तबला व टाळ संच उपलब्ध करून दिला.




Comments