वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

वरोऱ्यात 69 हजारांचा विदेशी दारूसाठा जप्त; हिंगणघाटच्या आरोपीवर गुन्हा. दारू कोणत्या दुकानातून घेतली याचा तपास सुरू आहे.

वरोऱ्यात 69 हजारांचा विदेशी दारूसाठा जप्त; हिंगणघाटच्या आरोपीवर गुन्हा.

 दारू कोणत्या दुकानातून घेतली याचा तपास सुरू आहे.

वरोरा, दि. 29 जून : वरोरा पोलिसांनी अवैध दारूविरोधी मोहिमेदरम्यान कारवाई करत एका व्यक्तीकडून सुमारे ₹69,320 किमतीचा विदेशी दारूसाठा व मोटारसायकल जप्त केली. या प्रकरणी दिनेश कालुजी सिडाम (वय 45, रा. संत चैकाबा वार्ड, हिंगणघाट, जि. वर्धा) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस हवालदार सुखराज आर. यादव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 29 जून रोजी वरोरा शहरात अवैध दारू विक्री, जुगार व इतर बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस पथक गस्त घालत होते. त्यावेळी मुखबिराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे उपजिल्हा रुग्णालय परिसरात सापळा रचण्यात आला.

दरम्यान, आंबेडकर चौकाकडून जाजू चौकाच्या दिशेने येणारी एमएच-32-एई-2753 क्रमांकाची हिरो पॅशन मोटारसायकल संशयावरून थांबविण्यात आली. वाहनाच्या कॅरिअरला बांधलेल्या प्लास्टिकच्या चुंगडीत तपासणी केली असता 32 बाटल्या (180 मि.ली.) रॉयल स्टॅग व्हिस्की (किंमत ₹8,000) आणि 6 बाटल्या (180 मि.ली.) इम्पिरियल ब्ल्यू व्हिस्की (किंमत ₹1,320) असा विदेशी दारूसाठा आढळून आला. याशिवाय ₹60,000 किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली.

आरोपीकडे विदेशी दारू बाळगण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाल्याने दारूच्या बाटल्यांचे नमुने पंचांसमक्ष सी.ए. तपासणीसाठी सीलबंद करण्यात आले. त्यानंतर मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. 

ही दारू कोणाच्या दुकानातून विकत घेतली होती याचा तपास सुरु आहे. अजून पर्यंत इतका मोठा साठा विकल्या प्रकरणात कोणत्याही दुकानदारावर कारवाई मात्र झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क  अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

ही कारवाई पोलीस हवालदार सुखराज आर. यादव, पोलीस हवालदार अमोल नवघरे, पोलीस अंमलदार महेश गावतुरे तसेच पंचांच्या उपस्थितीत करण्यात आली. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.

Comments