वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

आमडी येथे अवैध देशी दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई; आरोपी घटनास्थळावरून फरार, 50 दारूच्या बाटल्या जप्त

आमडी येथे अवैध देशी दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई; आरोपी घटनास्थळावरून फरार, 50 दारूच्या बाटल्या जप्त

वरोरा प्रतिनिधी :
वरोरा पोलीस ठाण्यांतर्गत माढेळी पोलीस दुरक्षेत्राच्या हद्दीतील मौजा आमडी येथे अवैधरित्या देशी दारूची विक्री करणाऱ्या एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान आरोपी पोलिसांना पाहताच घटनास्थळावरून फरार झाला असून त्याच्या शेतातून देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला.
पोलीस हवालदार  यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. 2 जुलै 2026 रोजी पोलीस अंमलदार रोशन तामसेटवार यांच्यासह माढेळी पोलीस दुरक्षेत्रात पेट्रोलिंग सुरू असताना मुखबिरामार्फत माहिती मिळाली की, वसंता मडावी (रा. आमडी, ता. वरोरा, जि. चंद्रपूर) हा स्वतःच्या शेतात अवैधरित्या देशी दारूची विक्री करीत आहे.
माहितीच्या आधारे पोलिसांनी पंच  रा. आमडी यांना सोबत घेऊन संबंधित ठिकाणी छापा टाकला. पोलिसांचे पथक येत असल्याचे पाहताच आरोपी वसंता मडावी घटनास्थळावरून शेताच्या दिशेने पळून गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला; मात्र तो फरार होण्यात यशस्वी झाला.
त्यानंतर पंचांसमक्ष शेताची झडती घेतली असता रॉकेट देशी दारू (संत्रा) कंपनीच्या प्रत्येकी 50 मि.ली. क्षमतेच्या 50 सिलबंद प्लास्टिकच्या बाटल्या, अंदाजे ₹2,000 किमतीचा मुद्देमाल, जप्त करण्यात आला. पंचनामा करून मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
या प्रकरणी आरोपी वसंता मडावी याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(ई) अन्वये वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

.........

Comments