लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत कारचे ₹40 हजारांचे नुकसान; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल.

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत कारचे ₹40 हजारांचे नुकसान; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

वरोरा : तालुक्यातील चिकणी येथे भरधाव व निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालवून कारला धडक देत अपघात करून घटनास्थळावरून पसार झालेल्या ट्रॅक्टर चालकाविरुद्ध वरोरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार डॉ. हेमंत वासुदेवराव खापने (रा. आझाद वॉर्ड, वरोरा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी (दि. २५ जुलै) सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास ते त्यांच्या किया सेल्टॉस (MH-34 CJ-0606) या कारने चिकणी येथून वरोऱ्याकडे येत होते. त्यावेळी आरोपी रणजीत भास्कर भोयर (रा. चिकणी, ता. वरोरा) याने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर (MH-34 CD-9048) व ट्रॉली (MH-34 CJ-4320) भरधाव व निष्काळजीपणे चालवून कारच्या मागील उजव्या बाजूस जोरदार धडक दिली. या अपघातात कारचे मागील दार व टेललाइटचे नुकसान होऊन सुमारे ₹४० हजारांचे नुकसान झाले. धडक दिल्यानंतर चालक घटनास्थळावर न थांबता पसार झाला, असे तक्रारीत नमूद आहे. 

या प्रकरणी वरोरा पोलिसांनी आरोपी रणजीत भास्कर भोयर याच्याविरुद्ध मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १८४, १३४ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २८१ व ३२४(४) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Comments