लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

*संघाच्या शाखेत संस्कारक्षम माणूस घडवण्याचे कार्य :अरविंद कुकडे* ‌ *समाजाला संघटित करण्यासाठी संघात येण्याचे केले आवाहन**"युवाकुंभ 2026" मध्ये प्रतिपादन*

*संघाच्या शाखेत संस्कारक्षम माणूस घडवण्याचे कार्य :अरविंद कुकडे* ‌

 *समाजाला संघटित करण्यासाठी संघात येण्याचे केले आवाहन*
*"युवाकुंभ 2026" मध्ये प्रतिपादन*

 वरोडा : शाम ठेंगडी 

      ‌ त्याग, तपस्या, शौर्य, निस्वार्थपणा, बलिदान, देशभक्ती याची चर्चा साहित्यातून नव्हे तर प्रत्यक्ष कार्यातून होते. म्हणून संघ स्वयंसेवक यास प्राधान्य देत देशाला सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी प्रयत्न करीत असतो. संवेदनक्षम मन संस्कारातून निर्माण होते. समाजातील दोषांची चर्चा न करता देशभक्तीपर वातावरण निर्माण करून संघटित समाजाच्या निर्मितीसाठी संघात या असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विदर्भ प्रांताचे संपर्कप्रमुख अरविंद कुकडे यांनी आज वरोडा येथे बोलताना काढले. 
        राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त वरोडा शाखेतर्फे आज 19 जुलै रोज रविवारला आयोजित" युवाकुंभ 2026" च्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. येथील सद्भभावना चौकातील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शेतकरी भवनात हे संमेलन आयोजित करण्यात आले होते.
      यावेळी व्यासपीठावर तालुका संघचालक सुनील सरोदे,नगरसंघचालक मनोज रेलकर,युवाकुंभचे संयोजक राहुल दागमवार, सहसंयोजक अंकित तेलासे हे विराजमान झाले होते.
 युवाशक्ती व राष्ट्रभक्ती  हा मुख्य उद्देश घेऊन आयोजित या संमेलनात 16 ते 35 वयोगटातील जवळपास २२५ युवक  सहभागी झाले होते. यावेळी अखिल द्रविड यांनी "हम करे राष्ट्र आराधन" हे वैयक्तिक गीत सादर केले.
        संघाच्या एक तासाच्या शाखेत सदगुणांचा संस्कार करून माणूस घडविण्याचे कार्य केल्या जाते. देशभक्ती व राष्ट्र प्रथम हे संस्कार करून संघाने कार्यकर्ते घडविले आहेत. या संस्कारक्षम कार्यकर्त्यांमुळेच आजची अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. समाज व संघ या वेगवेगळ्या बाजू नसून समाजाला संघटित करणे हे संघाचे कार्य आहे.विपरीत परिस्थितीला अनुकूलतेत परावर्तित करण्याची ताकद युवकात आहे. यासाठी एक तासाच्या संघाच्या शाखेत या व संघाला समजून घ्या असेही आवाहन त्यांनी याप्रसंगी केले
     तालुका व नगर संघचालक  व सचिन जगताप यांच्या हस्ते झालेल्या दीप प्रज्वलनाने या युवा कुंभ मेळाव्याचे उद्घाटन झाले. यावेळी अखिलजी द्रविड यांनी "अब जाग उठो, कंबर कसो, मंजिल की राह बुलाती है" हे गीत सादर केले.
     राष्ट्रनिर्मिती आणि युवा विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित या युवा संमेलनात आपल्या करिअरच्या योग्य वाटा शोधणाऱ्या तरुणांसाठी नागपूर येथील प्रसिद्ध एज्युकेटर व करिअर गाईड सचिन जगताप यांनी युवकांना युवा उद्योजक व व्यवसायिकांसाठी  विशेष मार्गदर्शन केले.
 या युवाकुंभ संमेलनात नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा व स्थानिक स्तरावर यशस्वी उद्योजकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव  करण्यात आला.
       तीन सत्रात झालेल्या या संमेलनाचे संचलन व  उपस्थितांचे आभार गणेश नक्षीने यांनी तर शैलेश गुरुवार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

Comments