लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

रत्नमाला चौक बस स्थानकावरून विवाहित महिलेच्या पर्समधून 20 ग्रॅम सोन्याची पोत व रोख रक्कम लंपास.

रत्नमाला चौक बस स्थानकावरून विवाहित महिलेच्या पर्समधून 20 ग्रॅम सोन्याची पोत व रोख रक्कम लंपास.

वरोरा प्रतिनिधी :
वरोरा शहरातील रत्नमाला चौक बसथांब्यावर बसमध्ये चढण्याच्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात दोन महिलांनी एका विवाहित महिलेच्या पर्समधून 20 ग्रॅम वजनाची काळ्या मण्यांची सोन्याची पोत व रोख 2 हजार 500 रुपये, असा एकूण 2 लाख 82 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात अज्ञात दोन महिलांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे लग्न श्रीकांत जांभुळकर यांच्याशी सन 2018 मध्ये झाले आहे. त्या 30 जून 2026 रोजी आपल्या काकू कविता उरकुळे यांच्यासह वरोरा येथे मोठे वडील अरुण लाडेकर यांच्या घरी आयोजित लग्नाच्या स्वागत समारंभासाठी (रिसेप्शन) आल्या होत्या.

त्यानंतर 1 जुलै 2026 रोजी सायंकाळी साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी या कविता उरकुळे (वय 43, रा. अजंकी, ता. हिंगणघाट), गायत्री धनराज उरकुळे (वय 19) आणि आपल्या पाच वर्षीय मुलगी हिच्यासह वरोरा येथून जामला येथे जाण्यासाठी रत्नमाला चौक बसथांब्यावर बसची प्रतीक्षा करत होत्या.

दरम्यान, राजुरा–नागपूर एसटी बस बसथांब्यावर आली. बसमध्ये मोठी गर्दी असल्याने फिर्यादी आपल्या मुलीसह बसमध्ये चढत असताना एका महिलेने त्यांच्या मुलीला जोरात दाबल्याने त्यांनी संबंधित महिलेला "माझी मुलगी आहे, नीट रहा, धक्का मारू नका," असे सांगितले. यावेळी बसमध्ये प्रचंड गर्दी असल्याने वाहकाने बसमध्ये जागा नसल्याचे सांगितल्यामुळे त्या बसथांब्यावरच थांबल्या.

यानंतर फिर्यादी यांनी आपल्या पर्सची पाहणी केली असता, पर्समधील छोट्या पर्समध्ये ठेवलेली 20 ग्रॅम वजनाची काळ्या मण्यांची सोन्याची पोत (अंदाजे किंमत 2 लाख 80 हजार रुपये) आणि रोख 2 हजार 500 रुपये असा एकूण 2 लाख 82 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, बसमध्ये चढत असताना त्यांच्या आजूबाजूला दोन अनोळखी महिला संशयास्पदरीत्या घुटमळत होत्या. त्यापैकी एक महिला अंदाजे 25 ते 30 वर्षे वयोगटातील, गरोदर असून तिने काळ्या फुलांची साडी परिधान केली होती, तर तिच्यासोबत असलेली दुसरी महिला अंदाजे 20 ते 25 वर्षे वयोगटातील असून तिने काळ्या रंगाचा सलवार सूट परिधान केला होता. या दोघींनी गर्दीचा फायदा घेत धक्का देऊन पर्समधील दागिने व रोख रक्कम चोरून नागपूरच्या दिशेने पलायन केल्याचा फिर्यादीला संशय आहे.

या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात अज्ञात दोन महिलांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपींचा शोध सुरू आहे.



Comments