वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

पानवडाळा परिसरात सहा शेतकऱ्यांच्या शेतावर चोरीचा धुमाकूळ; शेतीची अवजारे व साहित्य लंपासअज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल; सुमारे ₹1.44 लाखांचा मुद्देमाल चोरी

पानवडाळा परिसरात सहा शेतकऱ्यांच्या शेतावर चोरीचा धुमाकूळ; शेतीची अवजारे व साहित्य लंपास

अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल; सुमारे ₹1.44 लाखांचा मुद्देमाल चोरी

वरोरा | दि. 13 जुलै 2026
वरोरा तालुक्यातील पानवडाळा परिसरात एका रात्रीत सहा शेतकऱ्यांच्या शेतातून शेतीची अवजारे, लोखंडी गेट, बैलगाडीची चाके, स्प्रे पंप, स्प्रिंकलर, सायकल व इतर साहित्य चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फिर्यादी सूर्यभान मानिकराम रताने (रा. पानवडाळा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 11 जुलै रोजी सायंकाळी शेतातून घरी आल्यानंतर सर्व साहित्य सुरक्षित होते. मात्र 12 जुलै रोजी सकाळी शेतात गेल्यानंतर लोखंडी गेट व बैलगाडीची चाके चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात पाहणी केल्यानंतर शेजारील शेतकरी अनिल चिकटे, अतिश भोयर, निलेश डोहे, प्रमोद काळे व दादाजी डेठे यांच्या शेतातीलही विविध शेती अवजारे चोरीस गेल्याचे उघड झाले. 

चोरीमध्ये बैलगाडीची लोखंडी चाके, लोखंडी गेट, स्प्रे पंप, झाडे कापण्याचे मशीन, 14 स्प्रिंकलर, लोखंडी डवरे, पेरणी साहित्य, लोखंडी फण, जुनी सायकल, डंबेल्स आदी साहित्याचा समावेश असून, एकूण ₹1,44,600 किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. 

शेतकऱ्यांचे साहित्य चोरीला जाणे नवीन भाग नसून आता मोठ्या प्रमाणात चोरीचे प्रमाण वाढल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. पाण्याची मोटार चोरल्यानंतर वायर जाळून आतील तांब्याची तार भंगारात विकली जाते.वरोरा शहरात भंगार दुकानात स्वस्त दरात लोखंड खरेदी करीत असल्याने भुरटे चोर हा सगळा माल ठराविक भंगार दुकानात कवडीमोल भावाने विकत असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर पोलिसांनाही ही वस्तू मिळत नाही. त्यामुळे वेळीच या सगळ्या साखळीचा नायनाट करणे आवश्यक आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास वरोरा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संतोष किसन पवार करीत आहेत. 


Comments