लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोरा पोलिसांची मोठी कामगिरी; 13 दुचाकी जप्त, मोटारसायकल चोरी करणाऱ्या तिघांना अटक.

वरोरा पोलिसांची मोठी कामगिरी; 13 दुचाकी जप्त, मोटारसायकल चोरी करणाऱ्या तिघांना अटक.

सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे उलगडला गुन्हा; 6.40 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

वरोरा, प्रतिनिधी :
वरोरा शहरात वारंवार घडणाऱ्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालत वरोरा पोलिसांनी मोठी कारवाई करत 13 चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या असून तिघा आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे 6 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दि. 4 जुलै 2026 रोजी अमोल दयाराम भोग (रा. वैष्णो नगर, वरोरा) यांनी त्यांची एमएच-34 बीके-5527 क्रमांकाची सुमारे 40 हजार रुपये किमतीची मोटारसायकल चोरीला गेल्याची तक्रार वरोरा पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार गुन्हा क्र. 789/2026 कलम 303(2) भारतीय न्याय संहिता, 2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाने तपास सुरू केला. शहरातील 50 सीसीटीव्ही कॅमेरे तसेच नागपूर–चंद्रपूर महामार्गावरील 70 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी हेमंत विनोद चौधरी (रा. शिंगोव गोटमाडी, ता. समुद्रपूर, जि. वर्धा) आणि सुरज एकनाथ उमरे (रा. दहेगाव, ता. वरोरा) यांना ताब्यात घेतले.


चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी वरोरा शहरातून 11 मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. चोरीच्या दुचाकी त्यांनी वर्धा जिल्ह्यात विक्रीसाठी ठेवल्याचे उघड झाले. पुढील तपासात प्रमोद रामकृष्ण हेपट (रा. खांजी वार्ड, वरोरा) याने चोरीच्या वाहनांसाठी बनावट आरसी (नोंदणी प्रमाणपत्रे) तयार करून दिल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्याकडून बनावट आरसीसह दोन मोटारसायकली, सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईत एकूण 13 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत 6 लाख 40 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद भस्मे तसेच वरोरा पोलीस ठाण्यातील विशेष तपास पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

.........



Comments