वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

धोपटाळा कॉलनीतील WCL क्वॉर्टरमध्ये विवाहितेचा गळा चिरून खून; परिसरात खळबळ

धोपटाळा कॉलनीतील WCL क्वॉर्टरमध्ये विवाहितेचा गळा चिरून खून; परिसरात खळबळ

राजूरा-30/5/2026 
राजुरा तालुक्यातील धोपटाळा कॉलनीत थरारक घटना
राजुरा : धोपटाळा कॉलनी येथील WCL क्वॉर्टरमध्ये एका विवाहित महिलेचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून राजुरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
फिर्यादी रणधिर राजू कुंभारे (वय 37, रा. महाकाली कॉलरी, कपिल चौक, चंद्रपूर) यांनी राजुरा पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे लग्न शितल गोमासे यांच्यासोबत 9 मे 2014 रोजी झाले होते. त्यांना 12 वर्षांची मुलगी आहे. शितल या उन्हाळी सुट्टी आणि कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त मुलीसह धोपटाळा कॉलनीतील माहेरी गेल्या होत्या.
दरम्यान, 29 मे रोजी सकाळी फिर्यादी यांना शेजारी राहणाऱ्या व्यक्तीचा फोन आला. “तुमच्या पत्नीने रक्ताची उलटी केली असून त्या हालचाल करत नाहीत,” अशी माहिती मिळाल्यानंतर रणधिर कुंभारे तातडीने धोपटाळा येथे पोहोचले. घरातील शेवटच्या खोलीत खाटेवर शितल या रक्ताच्या थारोळ्यात पालथ्या अवस्थेत पडलेल्या दिसल्या. त्यांच्या जवळ रक्त लागलेला रुमालही आढळून आला.

 सकाळी उठल्यानंतर आई दिसत नसल्याने शोध घेतला असता शेवटच्या खोलीत त्या रक्तबंबाळ अवस्थेत आढळल्या.
घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर पंचनामा करण्यात आला. तपासादरम्यान शितल यांचा गळा धारदार शस्त्राने चिरण्यात आल्याचे समोर आले. 

राजुरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1) – खून कलम 332(अ) – घरफोडी/घरात अनधिकृत प्रवेश करून गंभीर गुन्हा
 दाखल केला आहे. पुढील तपास राजुरा पोलीस व lcb चंद्रपूर करीत आहेत.


Comments