वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

ग्रामीण भागात ट्युशनशिवाय मुलींचा SSC मध्ये दबदबा; साक्षी भुडेने मिळविला 93.80% गुण

ग्रामीण भागात ट्युशनशिवाय मुलींचा SSC मध्ये दबदबा; साक्षी भुडेने मिळविला 93.80% गुण

चिकणी (जि. चंद्रपूर) : किसान विद्यालय चिकणीच्या विद्यार्थ्यांनी एसएससी बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट निकाल देत ग्रामीण भागात यशाचा झेंडा रोवला आहे. शाळेचा एकूण निकाल 82.10% लागला असून, विशेष म्हणजे या सर्व यशात तीन विद्यार्थिनींनी आपल्या कामगिरीने शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.
यामध्ये कुमारी साक्षी राजू भुडे हिने शाळेत प्रथम क्रमांक मिळवून 93.80% गुण संपादन केले. द्वितीय क्रमांक सांजवी गुलाब शिवणकर हिने 83.20% गुण मिळवत पटकावला, तर तृतीय क्रमांक खुशी सुरेश गानफाडे हिने 78.80% गुण घेतला.

ग्रामीण भागात कधीही ट्युशनची सुविधा उपलब्ध नसतानाही या मुलींनी बिगर ट्युशन हे यश मिळविले आहे. शाळेतर्फे तसेच चिकणी गावातर्फे या विद्यार्थिनींचे सर्वत्र कौतुक होत आहे. उत्तम खेळाडू म्हणूनही या तिन्ही विद्यार्थिनी कबड्डी खेळात यशस्वी ठरल्या आहेत.

आपल्या यशाचे श्रेय या विद्यार्थिनींनी आपले आई-वडील, संस्थेचे अध्यक्ष श्री रामदासजी माथनकर, सचिव सुभाष भाऊ माथनकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय पिंपळशेंडे सर, शाळेतील इतर शिक्षक तसेच कबड्डी प्रशिक्षक श्री बाबा आगलावे सर यांना दिले आहे.
...........

Comments