वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

नेहरू चौकातील कोल्ड्रिंक सेंटरवर पोलिसांचा छापाबिनापरवाना दारू पिण्यास जागा उपलब्ध करून दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल

नेहरू चौकातील कोल्ड्रिंक सेंटरवर पोलिसांचा छापा
बिनापरवाना दारू पिण्यास जागा उपलब्ध करून दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल

वरोरा : शहरातील नेहरू चौक परिसरात सुरू असलेल्या अवैध दारूगुत्त्यावर वरोरा पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. या प्रकरणी साई सरकार कोल्ड्रिंग सेंटरचा मालक प्रफुल चिधुजी रुयारकर (वय ३४, रा. आझाद वॉर्ड, वरोरा) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ७ मे २०२६ रोजी सायंकाळी वरोरा शहरात अवैध दारूविक्री व दारूगुत्त्यांविरोधात पेट्रोलिंग सुरू असताना नेहरू चौकातील साई सरकार कोल्ड्रिंग सेंटरमध्ये बिनापरवाना दारू पिण्यास जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी दुकानात दोन व्यक्ती टेबलावर दारूच्या बाटल्या ठेवून दारू पिताना आढळले. पोलिसांना पाहताच दोघेही घटनास्थळावरून पसार झाले.
त्यानंतर पोलिसांनी दुकानाच्या काउंटरवर उपस्थित असलेल्या व्यक्तीची चौकशी केली असता त्याने आपले नाव प्रफुल रुयारकर असल्याचे सांगितले. पोलिसांनी दारू पिण्यासाठी आवश्यक परवान्याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.
छाप्यामध्ये घटनास्थळावरून रॉयल स्टॅग व आयकोनिक व्हाईट कंपनीच्या विदेशी दारूच्या बाटल्या, अर्धवट भरलेले ग्लास व पाण्याच्या बाटल्या असा एकूण ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त माल सील करून पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आला आहे.
या प्रकरणी पोहवा सुखराज यादव यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध कलम ६८ महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.

Comments