वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

इरई धरण परिसरात वाघाचा हल्लादुपारच्या वेळी गाय ठार; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

इरई धरण परिसरात वाघाचा हल्ला

दुपारच्या वेळी गाय ठार; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

वरोरा : दिनांक ८ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे ३:३० वाजताच्या दरम्यान इरई धरण परिसरातील बीट क्रमांक ९५६ मध्ये वाघाने हल्ला करून एका गायीचा बळी घेतल्याची घटना घडली. सदर गाय ही अभिमान चौखे यांची असल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, मागील काही दिवसांपासून या भागात वाघांचा वावर वाढल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. विशेषतः सिताराम पेठ परिसरात वारंवार वाघ दिसत असल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
स्थानिक नागरिकांनी वनविभागाने तात्काळ लक्ष देऊन परिसरात गस्त वाढवावी, तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे. शेतकरी व पशुपालकांनी जनावरे जंगलालगतच्या भागात सोडताना खबरदारी घ्यावी, असे आवाहनही करण्यात येत आहे.

Comments