गणेशोत्सवात नागरिकांसाठी आरोग्य शिबिर; मोरया गणेश व विराट गणेश मंडळाचा अभिनव उपक्रम.

गणेशोत्सवात नागरिकांसाठी आरोग्य शिबिर; मोरया गणेश व विराट गणेश मंडळाचा  अभिनव उपक्रम.  गणेश मंडळाचे अध्यक्ष व नगरसेवक बंडू देऊळकर व आपला दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने समाज उपयोगी उपक्रम. विराट गणेश मंडळाकडून मोफत हेल्थ चेकअपचा लाभ घेण्याचे आवाहन. वरोरा : गणेशोत्सवाच्या उत्साहाला समाजसेवेची जोड देत मोरया गणेश मंडळ, छत्रपती शिवाजी चौक आणि शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र, टिळक वॉर्ड क्रमांक ३, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक २ मध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात एकूण १११ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये ७० पुरुष आणि ४१ महिलांचा समावेश होता. नागरिकांची बीपी, शुगर तसेच आवश्यक रक्त तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर संबंधित नागरिकांना पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नियमित आरोग्य तपासणी करून आरोग्याबाबत सजग राहण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. शिबिरासाठी डॉ. गोविंद सिंग, वैभव ठाकरे, ओम उगले, सेजल बोरकर (टेक्निकल लॅब), समृद्धी दडमल (टेक्निकल लॅब), महादेव क...

शेगाव बु. येथे दगडाने ठेचून वृद्धाची हत्यानाली साफसफाईच्या वादातून प्रकार; आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल.

शेगाव बु. येथे दगडाने ठेचून वृद्धाची हत्या

नाली साफसफाईच्या वादातून प्रकार; आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

शेगाव -13/5/26

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील शेगाव बु. ता. वरोरा येथे नाली साफसफाईच्या कारणावरून झालेल्या वादातून एका 65 वर्षीय वृद्धाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शेगाव बु. पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मृतक व्यक्तीचे नाव विश्वनाथ परसराम कामडी (वय 65) रा. मठ वार्ड, शेगाव बु. असून नालीसफाईच्या कारणावरून आरोपी महेंद्र रमेश भुरे रा. दहेगाव जोशी, ता. पारशिवणी, जि. नागपूर यांनी जीवे मारले .  याच्याविरुद्ध शेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या प्रकरणी मृताची मुलगी सौ. ज्योती विलास सोनुने (वय 34) यांनी शेगाव बु. पोलीस स्टेशन येथे तोंडी फिर्याद दिली. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, त्या आपल्या दोन मुलांसह आई-वडिलांसोबत राहत होत्या. 

दि. 12 मे 2026 रोजी सकाळी सुमारे 6.30 वाजता विश्वनाथ कामडी हे चहा पिऊन फिरण्यासाठी घराबाहेर गेले होते. त्यानंतर सकाळी अंदाजे 8.30 वाजण्याच्या सुमारास शेजाऱ्यांनी ज्योती सोनुने यांना माहिती दिली की, गावात नाली साफसफाईचे काम करणाऱ्या इसमाने  निमजे यांच्या घराजवळ त्यांच्या वडिलांना दगडाने ठेचून ठार मारले आहे.

माहिती मिळताच त्या घटनास्थळी पोहोचल्या असता त्यांच्या वडिलांच्या डोक्यावर दगडाने मारहाण झालेली दिसून आली. घटनास्थळी रक्ताने माखलेला दगडही आढळून आला.

त्यानंतर स्थानिक नागरिकांनी महेंद्र रमेश भुरे याने नाली साफसफाईच्या कारणावरून झालेल्या वादात विश्वनाथ कामडी यांच्या डोक्यात दगड मारून हत्या केल्याचे सांगितले.

या प्रकरणी शेगाव बु. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 103(1) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक योगेंद्रसिंग कजेन्द्रसिंग यादव करीत आहेत.

.......





Comments