गणेशोत्सवात नागरिकांसाठी आरोग्य शिबिर; मोरया गणेश व विराट गणेश मंडळाचा अभिनव उपक्रम.

गणेशोत्सवात नागरिकांसाठी आरोग्य शिबिर; मोरया गणेश व विराट गणेश मंडळाचा  अभिनव उपक्रम. 


गणेश मंडळाचे अध्यक्ष व नगरसेवक बंडू देऊळकर व आपला दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने समाज उपयोगी उपक्रम.

विराट गणेश मंडळाकडून मोफत हेल्थ चेकअपचा लाभ घेण्याचे आवाहन.

वरोरा : गणेशोत्सवाच्या उत्साहाला समाजसेवेची जोड देत मोरया गणेश मंडळ, छत्रपती शिवाजी चौक आणि शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र, टिळक वॉर्ड क्रमांक ३, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक २ मध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शिबिरात एकूण १११ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये ७० पुरुष आणि ४१ महिलांचा समावेश होता. नागरिकांची बीपी, शुगर तसेच आवश्यक रक्त तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर संबंधित नागरिकांना पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नियमित आरोग्य तपासणी करून आरोग्याबाबत सजग राहण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

शिबिरासाठी डॉ. गोविंद सिंग, वैभव ठाकरे, ओम उगले, सेजल बोरकर (टेक्निकल लॅब), समृद्धी दडमल (टेक्निकल लॅब), महादेव कोंगरे आणि सिस्टर स्वाती ढेंगळे यांनी आरोग्य तपासणी व मार्गदर्शनासाठी विशेष सहकार्य केले.


या उपक्रमाच्या आयोजनात श्री. बंडू भाऊराव देऊळकर, नगरसेवक, नगर परिषद वरोरा यांनी प्रमुख समन्वयाची भूमिका बजावली. प्रभाग क्रमांक २ मधील प्रत्येक गणेश मंडळाच्या माध्यमातून अशा प्रकारची आरोग्य तपासणी शिबिरे राबविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी किरण कामडी, सौरभ लोहकरे, शिरीष डहाके, विक्की जुमनाके, पवन कामडी, उज्वल लोहकरे, अमन वरखडे, अभिषेक भुयांन, प्रणव दुर्गपुरोहित, शुभम सुराणा, धीरज शर्मा, वैभव राजपूत, अक्षय कामडी, साई गोल्ला, पायथा राणे, हर्षल दडमल, सुरेंद्र चौधरी, प्रज्वल ढवस, कृष्णा मत्ते, मोहित किन्नके, अंकुश चोरडिया, नयन कामडी, गोपी शेख, आकाश गंधारे, मयूर पर्बत, आयुष नरवाडे, योगेश लांडगे, पवन गायकवाड, किसन वर्मा, तेजस गोरशेट्टीवार, आदित्य गायकवाड आणि आयुष गोहाने यांनी विशेष सहकार्य केले.

रमेशराव दारव्हनकर आणि नंदकिशोर शर्मा यांनी यावेळी प्रमुख मार्गदर्शन केले.


विराट गणेश मंडळाकडून मोफत हेल्थ चेकअपचा लाभ घेण्याचे आवाहन

दरम्यान, प्रभाकर क्रमांक सात मधील विराट गणेश मंडळाच्या वतीने मोफत हेल्थ चेकअप शिबिर सुरू असून, ज्यांना आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यायची आहे, विशेषतः गरजू नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

आरोग्याची काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. तपासणी पूर्णपणे मोफत असल्याने नागरिकांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा, असे आवाहन विराट गणेश मंडळाने केले आहे.


...........

    गणेशोत्सव सणानिमित्त सर्व नागरिकांना ठाकरे परिवारातर्फे  शुभेच्छा.

..........


Comments