वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

बांधकामाच्या वादातून सिव्हिल इंजिनियरवर लोखंडी पावडा व रॅप्टरने हल्ला

बांधकामाच्या वादातून सिव्हिल इंजिनियरवर लोखंडी पावडा व रॅप्टरने हल्ला

वरोरा : घर बांधकामाच्या कामादरम्यान झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर मारहाणीमध्ये झाल्याची घटना वरोरा शहरातील व्होल्टाज कॉलनी परिसरात घडली. या प्रकरणी वरोरा पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल मोनीश अब्दुल मतीन शेख (वय 32), रा. अपूर्वा नगर, आनंदवन चौक, वरोरा हे सिव्हिल इंजिनियर असून बांधकामाचे ठेके घेतात. त्यांनी प्रविण हरबडे यांच्या घराचे सुमारे 18 लाख 80 हजार रुपयांचे बांधकामाचे काम घेतले होते. शेजारीच रमेशकुमार श्रीराम सिंह यांचेही घराचे बांधकाम सुरू होते.
29 मे रोजी सकाळी अकराच्या सुमारास शेख हे बांधकाम साईटवर काम पाहत असताना दुपारी एक वाजताच्या सुमारास मजुरामार्फत त्यांना रमेशकुमार सिंह यांनी बोलावले. पिलर साठी खोदलेल्या खड्ड्यामुळे त्यांच्या घराशेजारची माती खचत असल्याचा आरोप सिंह यांनी केला. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला.
तक्रारीनुसार, काही वेळानंतर रमेशकुमार सिंह व त्यांचा साळा शिव मेहरा हे लोखंडी पावडा व रॅप्टर घेऊन आले. त्यांनी शिवीगाळ करत अब्दुल शेख यांच्यावर हल्ला केला. लोखंडी पावड्याने पाठीवर तर रॅप्टरने मान व पाठीवर मारून दुखापत केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
दरम्यान, झटापटीत रमेशकुमार सिंह यांचा तोल जाऊन ते पिलरच्या खड्ड्यात पडल्याचे तसेच रॅप्टर हिसकावताना तो शिव मेहरा यांच्या चेहऱ्याला लागल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.

Comments