वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

माजरीत मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाडराजेश पिंपळकर ताब्यात; रोख रकमेसह सट्टापट्टी साहित्य जप्त.

माजरीत मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड
राजेश पिंपळकर ताब्यात; रोख रकमेसह सट्टापट्टी साहित्य जप्त.

भद्रावती 
माजरी पोलिसांनी बाजार वॉर्ड परिसरात सुरू असलेल्या सट्टापट्टी व मटका जुगारावर कारवाई करत एका आरोपीला ताब्यात घेतले. ही कारवाई 11 मे 2026 रोजी पोलिसांच्या पेट्रोलिंगदरम्यान करण्यात आली.
पोलीस उपनिरीक्षक हरिदास चोपने हे पोलीस कर्मचारी रविंद्र कन्नाके व अनिस शेख यांच्यासह माजरी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना मुखबिरामार्फत माहिती मिळाली की, बाजार वॉर्ड येथील रेल्वे लाईनजवळ एक इसम लोकांकडून पैसे घेऊन सट्टापट्टी व मटका जुगार चालवत आहे. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी पंचांसमक्ष घटनास्थळी धाड टाकली.
धाडीदरम्यान काही जुगार खेळणारे व्यक्ती पळून गेले, मात्र सट्टापट्टी स्वीकारणारा इसम पोलिसांच्या ताब्यात आला. चौकशीत त्याने आपले नाव राजेश गुलाब पिंपळकर (वय 58, रा. माजरी वस्ती, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर) असे सांगितले.
पोलिसांनी आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून रोख 700 रुपये, एक पेन व सट्टापट्टीचे आकडे लिहिलेली कागदी चिठ्ठी असा एकूण 705 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये कलम 12(अ) अंतर्गत माजरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Comments