वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

सामाईक गल्लीच्या वादातून तिघांवर जीवघेणा हल्ल्याचा गुन्हा

सामाईक गल्लीच्या वादातून तिघांवर जीवघेणा हल्ल्याचा गुन्हा

वरोरा : राजीव गांधी वार्ड परिसरात सामाईक जाण्या-येण्याच्या गल्लीच्या जागेवरून झालेल्या वादातून तिघांनी विटांनी हल्ला करून तिघांना गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फिर्यादी मोहम्मद रफ्फीक मोहम्मद शफीक पठाण (वय 56) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी दोन महिन्यांपूर्वी राजीव गांधी वार्ड येथे टिनाचे घर खरेदी केले होते. त्यांच्या घराशेजारी असलेल्या तीन फुटांच्या सामाईक गल्लीच्या जागेवरून भाचा ईरफान आरीफ शेख व कुमुद उईके यांच्यात वाद सुरू होता.
दि. 29 मे रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास विष्णु मडावी, कुमुद उईके व शितल मडावी हे गल्लीमध्ये टेप लावून मोजमाप करत होते. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांना जागेबाबत विचारणा केली असता वाद निर्माण झाला. त्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत धमकी दिली व तेथे पडलेल्या बांधकामाच्या विटांनी हल्ला केला.
या हल्ल्यात फिर्यादी मोहम्मद पठाण यांच्या कपाळावर, ओठावर व डाव्या मांडीवर दुखापत झाली. तसेच त्यांचा मुलगा सहिजाद रफीक पठाण याच्या डोक्यावर, तोंडावर व छातीवर मार लागून डोक्यातून रक्तस्राव झाला. तर ईरफान आरीफ शेख यालाही डोक्यावर, खांद्यावर व मानेवर गंभीर दुखापत झाली असून त्याच्याही डोक्यातून रक्तस्राव झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी वरोरा पोलिसांनी विष्णु मडावी, कुमुद उईके व शितल मडावी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

Comments