वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

येथे संशयित एचटीबीटी कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त२८.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त; नागपूर व यवतमाळ येथील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

 येथे संशयित एचटीबीटी कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त
२८.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त; नागपूर व यवतमाळ येथील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

वरोरा : वरोरा-वणी बायपास रोडवरील कचरा डेपोजवळ कृषी विभागाच्या पथकाने कारवाई करत संशयित अनधिकृत एचटीबीटी (HTBT) कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त केला. या प्रकरणी वरोरा पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध विविध कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल केला असून तब्बल २८ लाख ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपींमध्ये
ईस्माईल कदीर खान (वय अंदाजे ५५, रा. वैष्णवदेवी नगर, वाठोडा, नागपूर)
परमानंद प्रेमानंद डाखरे (वय अंदाजे ५०, रा. टाकळी, ता. मारेगाव, जि. यवतमाळ)
यांचा समावेश आहे.
याबाबतची फिर्याद गजानन पंढरी हटवार (वय ४८), कृषी अधिकारी तथा बियाणे निरीक्षक, पंचायत समिती वरोरा यांनी वरोरा पोलीस ठाण्यात दिली.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कृषी विभागाच्या पथकाने सोमवार, दि. १८ मे २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.०५ वाजता वरोरा-वणी बायपास रोडवर आंबेकर पेट्रोल पंपाजवळ संशयित वाहन अडविले. MH-49-AR-4962 क्रमांकाच्या फिकट पिवळ्या रंगाच्या सुपर कॅरी मारुती टर्बो वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये पिवळ्या रंगाच्या सीलबंद पिशव्यांमध्ये कापूस बियाण्यांचा साठा आढळून आला.
तपासणीदरम्यान वाहन चालक ईस्माईल खान याने कागदपत्रे सादर केली. मात्र संशय आल्याने एक बॅग उघडून पाहिली असता त्यामध्ये संशयित HTBT Hybrid Cotton Seed Variety H-1100 आढळून आले.
यानंतर कृषी विभागाचे अधिकारी, भरारी पथक तसेच पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. तपासणीमध्ये
H-1100 वाणाचे २५ बॅगमध्ये १२५० पाकिटे
हरियाली 111 (TG) वाणाचे २५ बॅगमध्ये १२५० पाकिटे
अशी एकूण २५०० पाकिटे संशयित कापूस बियाणे आढळून आली. प्रत्येक पाकिटाचे वजन ४५० ग्रॅम असून एकूण वजन सुमारे ११२५ किलो आहे. बियाण्यांची किंमत अंदाजे २२ लाख ५२ हजार ५०० रुपये असल्याचे सांगण्यात आले.
याशिवाय माल वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले सुपर कॅरी वाहन अंदाजे ६ लाख रुपये किमतीचे असल्याने एकूण जप्त मुद्देमालाची किंमत २८ लाख ५२ हजार ५०० रुपये इतकी आहे.
दरम्यान, पंचनामा सुरू असताना परमानंद डाखरे घटनास्थळी पोहोचले व सदर माल स्वतःचा असल्याचे सांगितले.
कृषी विभागाने नमुना तपासणीसाठी दोन्ही वाणांचे प्रत्येकी ३ पाकिटे प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत.
आरोपींवर खालील कलमान्वये गुन्हा दाखल
पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ कलम ७, १५, १६
बियाणे अधिनियम १९६६ कलम ६(a), ६(b), ७(a), ७(c), ७(d), १९
बियाणे नियम १९६८ नियम ७ ते १५
अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ कलम ३ व ७
भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ कलम ३१८(४), ३(५)
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनीष जगन्नाथ तळेवार करीत आहेत.

Comments