वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

साई मंगल कार्यालयामागे अवैध सिंधी विक्रीवर पोलिसांची धाड.

साई मंगल कार्यालयामागे अवैध सिंधी विक्रीवर पोलिसांची धाड.

23 लिटर सिंधी जप्त; तेलंगणातील मजुराविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल

वरोरा- चेतन लूतडे 16/5/26
वरोरा पोलिसांनी अवैध दारू विक्रीविरोधात कारवाई करत साई मंगल कार्यालयाच्या मागील परिसरात छापा टाकून 23 लिटर सिंधी जप्त केली. ही कारवाई 15 मे 2026 रोजी सायंकाळी करण्यात आली.
पोलीस हवालदार नितीन देवराव भगत व त्यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की, साई मंगल कार्यालयामागील नयन ठोंबरे यांच्या घरात भाड्याने राहणारा एक इसम अवैधरित्या सिंधी साठवून विक्री करीत आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी धाड टाकली.
यावेळी लक्ष्मीनारायण आंजागौळ वंगा (वय 49), रा. सिध्दीपेठ, तेलंगणा ह.मु. वरोरा याच्या ताब्यातून दोन प्लास्टिक कॅन व सहा प्लास्टिक बाटल्यांमध्ये एकूण 23 लिटर सिंधी आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या सिंधीची किंमत अंदाजे 1 हजार 150 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी पंचासमक्ष सिंधीचा नमुना सीलबंद करून रासायनिक विश्लेषणासाठी राखून ठेवला. उर्वरित सिंधी नाशवंत असल्याने जागीच नष्ट करण्यात आली. संपूर्ण पंचनामा  करण्यात आला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) अन्वये वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

............................

खापरी येथे अवैध देशी दारू साठ्यावर पोलिसांची कारवाई

55 रॉकेट संत्रा दारूच्या बाटल्या जप्त; वृद्धाविरुद्ध गुन्हा दाखल

वरोरा पोलिसांनी खापरी येथे अवैधरित्या देशी दारू साठवून विक्री करणाऱ्या इसमावर कारवाई करत 55 रॉकेट संत्रा कंपनीच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या. ही कारवाई 15 मे 2026 रोजी सायंकाळी करण्यात आली.

पोलीस हवालदार संतोष किसन पवार व त्यांच्या पथकाला मुखबिरामार्फत माहिती मिळाली होती की, खापरी येथील मारोती नथ्थु कुळसंगे (वय 72) हे आपल्या राहत्या घरी अवैधरित्या दारू साठवून विक्री करीत आहेत. माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह त्यांच्या घरावर छापा टाकला.

घरझडतीदरम्यान घरासमोरील सायवान खोलीतील कापडी पिशवीमध्ये रॉकेट संत्रा कंपनीच्या लेबल असलेल्या प्रत्येकी 90 एम.एल. क्षमतेच्या 55 सिलबंद देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. जप्त करण्यात आलेल्या दारूची अंदाजे किंमत 2 हजार 200 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपीकडे दारू साठवण्याबाबत कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी पंचासमक्ष पंचनामा करून दारू जप्त केली. जप्त मालातील एक बाटली रासायनिक विश्लेषणासाठी सीलबंद करण्यात आली.

या प्रकरणी मारोती नथ्थु कुळसंगे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) अन्वये वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

.........

Comments