वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

रोटरी क्लब वरोराचा स्तुत्य उपक्रम; ४०० हून अधिक गरजूंनी घेतला मोफत आरोग्य शिबिराचा लाभ

रोटरी क्लब वरोराचा स्तुत्य उपक्रम; ४०० हून अधिक गरजूंनी घेतला मोफत आरोग्य शिबिराचा लाभ

वरोरा : समाजाप्रती आपले उत्तरदायित्व जपत रोटरी क्लब वरोरा यांच्या वतीने शेगाव (बुज.) येथे वृद्ध व गरजू नागरिकांसाठी भव्य मोफत नेत्र, दंत आणि स्त्रीरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. दि. २७ मे २०२६ रोजी पार पडलेल्या या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून ४०० हून अधिक नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या अनेक नागरिकांना उपचारासाठी मोठा खर्च परवडत नसल्याने आरोग्याकडे दुर्लक्ष करावे लागते. हीच गरज ओळखून रोटरी क्लब वरोराने “सेवा हीच आमची ओळख” हे ब्रीद समोर ठेवत समाजसेवेचा उपक्रम राबविला. याआधीही दि. ०७ मे रोजी चंदनखेडा येथे अशाच प्रकारचे शिबिर घेण्यात आले होते.
या शिबिरात नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत विविध मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. नेत्र तपासणीमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया तपासणी, चष्म्याचा नंबर काढणे, तिरळेपणा व काचबिंदू तपासणी तसेच मोफत आय ड्रॉप्सचे वाटप करण्यात आले. दंत तपासणीमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून दातांच्या समस्यांचे निदान करण्यात आले. याशिवाय रक्तदाब (BP) व मधुमेह (Sugar) तपासणीही विनामूल्य करण्यात आली. विशेष म्हणजे केवळ १०० रुपयांत दर्जेदार नंबरच्या चष्म्यांचे वितरण करण्यात आले.
या शिबिरात वरोरा येथील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. निखिल अ. लांबट, दंत चिकित्सक डॉ. स्नेहदीप रामटेके तसेच स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रणाली कामडी (झाडे) यांनी सेवा दिली. सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी सहभाग घेतला.
शिबिराचे आयोजन डॉ. प्रणाली कामडी (झाडे) यांच्या दवाखान्यात, गजानन कॉम्प्लेक्स, मेडिकल चौक, शेगाव (बुज.) येथे करण्यात आले होते. या उपक्रमासाठी रोटरी क्लब अध्यक्ष योगेश न. डोंगरवार, रोटेरियन अदनान सद्दीकोट, रोटेरियन अभिजित बोथले तसेच संजय जोगी, सुमित पाचभाई, किशोर भोयर आणि सुनील निखाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
“आपले डोळे… आमची जबाबदारी” या भावनेतून आयोजित या शिबिराचा लाभ शेगाव, महालगाव, वधाळा, खेमजाई, दादापूर, चारगाव, कोकेवाडा, सालोरी, मेसा, सोनेगाव, पळसगाव, वाघुली, निमसेडा, वनली, मानोरा, गुंजाळा, पोहा, वडधा, जुंजाळा, साखरा आदी गावांतील नागरिकांनी घेतला.

Comments