वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

बोर्डा चौकात सट्टा-पट्टी जुगारावर पोलिसांची कारवाई; आरोपी ताब्यात

बोर्डा चौकात सट्टा-पट्टी जुगारावर पोलिसांची कारवाई; आरोपी ताब्यात

वरोरा : वरोरा पोलिसांनी अवैध सट्टा-पट्टी जुगाराविरोधात कारवाई करत बोर्डा चौक परिसरातून एका युवकाला ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी (दि. 26 मे) दुपारी करण्यात आली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार संदीप विठ्ठल मुळे हे पोलीस अंमलदार विशाल राजुरकर यांच्यासह जुगार, दारू व इतर अवैध धंद्यांवर कारवाईसाठी पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, मुखबिरामार्फत माहिती मिळाली की, बोर्डा चौक येथे एक इसम सार्वजनिक रस्त्यावर लोकांकडून पैसे घेऊन कल्याण सट्टा-पट्टी जुगार चालवत आहे.

माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी धाड टाकली. पोलिसांना पाहताच सट्टा खेळणारे लोक घटनास्थळावरून पसार झाले. मात्र सट्टा-पट्टी घेणारा इसम जागेवर मिळून आला. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव ताजु अफताब शेख (वय 27), रा. कालरी वार्ड, वरोरा असे सांगितले.

पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून कल्याण सट्टा-पट्टी लिहिलेला कागद, दोन बॉलपेन आणि रोख 1450 रुपये असा एकूण 1460 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. घटनास्थळ पंचनामा करून संपूर्ण मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

या प्रकरणी आरोपी ताजु अफताब शेख याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.


Comments