वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

भरधाव गणराज ट्रॅव्हल्सची दुचाकीला समोरून धडक; चौकीदाराचा जागीच मृत्यू.

भरधाव गणराज ट्रॅव्हल्सची दुचाकीला समोरून धडक; चौकीदाराचा जागीच मृत्यू.

भद्रावती : सायवन फाट्याजवळ भरधाव वेगातील ट्रॅव्हल्सने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एका चौकीदाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी गणराज ट्रॅव्हल्स चालकाविरुद्ध भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृतकाचे नाव सभाजी रेशमाजी गायकर असे असून ते जिवती तालुक्यातील रहिवासी होते. सभाजी गायकर हे त्रिलोक प्रिकास्ट कंपनी, सायवन येथे चौकीदार म्हणून काम करीत होते व कंपनीच्या कॅम्पसमध्ये वास्तव्यास होते.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २२ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजताच्या दरम्यान ड्युटी संपल्यानंतर सभाजी गायकर हे सहकारी सरला यादव यांच्यासोबत होंडा शाईन दुचाकी (क्र. एमएच-34 सीएल-2485) ने भाजीपाला व किराणा सामान घेऊन कंपनीकडे परत येत होते. सायवन फाट्याजवळ पोहोचताच भद्रावतीकडून चंद्रपूरच्या दिशेने जाणारी गणराज ट्रॅव्हल्स (क्र. एमएच-34 बीझेड-6748) एका ट्रकला ओव्हरटेक करत असताना समोरून येऊन दुचाकीला जोरदार धडक दिली.
अपघात इतका भीषण होता की, सभाजी गायकर व सरला यादव हे रस्त्यावर फेकले गेले. त्यानंतर ट्रॅव्हल्स चालकाने दोघांनाही तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान सभाजी गायकर यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी ट्रॅव्हल्स चालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडवून आणल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. 

Comments