वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

वडगाव परिसरात अवैध देशी दारूसह एक जण पोलिसांच्या ताब्यात

वडगाव परिसरात अवैध देशी दारूसह एक जण पोलिसांच्या ताब्यात

वरोरा : वरोरा पोलिसांनी अवैध देशी दारू विक्रीविरोधात कारवाई करत वडगाव परिसरातून एका व्यक्तीस ताब्यात घेत मोठ्या प्रमाणात देशी दारू जप्त केली. ही कारवाई ७ मे २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोहवा संदिप विठ्ठल मुळे, सपोनि शरद भस्मे व पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना मुखबिरामार्फत माहिती मिळाली की, वडगाव येथील राजदरबार हॉटेल परिसरात एक इसम अवैधरित्या देशी दारू विक्रीसाठी बाळगून आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पंचांना सोबत घेऊन पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली.

यावेळी एक व्यक्ती हातात पिशवी घेऊन संशयित हालचाल करताना दिसून आला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव चंदन सुरजप्रकाश ओझा (वय ३६, रा. वागधरा, ता. वणी, जि. यवतमाळ) असे सांगितले. त्याच्या जवळील कापडी पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये रॉकेट संत्रा कंपनीच्या ९० एमएलच्या ३१ सिलबंद देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. जप्त करण्यात आलेल्या दारूची अंदाजे किंमत १ हजार २४० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सदर व्यक्तीकडे दारू बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष मुद्देमाल जप्त केला. त्यातील एक बाटली रासायनिक विश्लेषणासाठी सील करून नमुना म्हणून ठेवण्यात आली आहे.

या प्रकरणी चंदन सुरजप्रकाश ओझा याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.



Comments