वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

करंजी रेती घाटावरून घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वाटपाचा शुभारंभ

करंजी रेती घाटावरून घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वाटपाचा शुभारंभ

दि.16/5/26/-वरोरा 
वरोरा तालुक्यातील करंजी रेती घाटावरून घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वाटप योजनेचा शुभारंभ मा. आमदार करण देवतळे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. शासनाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण व शहरी भागातील घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, घर बांधकामासाठी आवश्यक असलेली रेती आता मोफत उपलब्ध होणार आहे.
यावेळी बोलताना आमदार करण देवतळे यांनी सांगितले की, सर्वसामान्य नागरिकांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे यासाठी शासन कटिबद्ध आहे. घरकुल लाभार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासनाने तत्परतेने कार्य करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. मोफत रेती वाटपामुळे लाभार्थ्यांचा आर्थिक भार कमी होऊन घरकुलांची कामे अधिक वेगाने पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमास वरोरा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. अर्चनाताई ठाकरे, उपविभागीय अधिकारी भस्के साहेब, तहसीलदार कौटकर साहेब, गट विकास अधिकारी मुंडकर साहेब, बाळूजी भोयर, देविदासजी ताजने, सुजितजी कष्टी, प्रभाकरजी कष्टी, निलेशजी मिलमिले, रामदासजी गाडगे, स्थानिक पदाधिकारी, प्रशासनातील अधिकारी, ग्रामस्थ तसेच मोठ्या संख्येने घरकुल लाभार्थी उपस्थित होते.
लाभार्थ्यांनी शासनाच्या या लोकहितकारी निर्णयाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले. गरजू नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासन सातत्याने कार्यरत असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
....

Comments