वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

बोर्डा चौकात सट्टापट्टीवर पोलिसांची धाड; दोघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा

 बोर्डा चौकात सट्टापट्टीवर पोलिसांची धाड; दोघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा

वरोरा | दि. 30 मे 2026

वरोरा पोलीस स्टेशनच्या पथकाने बोर्डा चौक परिसरात अवैध सट्टापट्टी व्यवसायावर धाड टाकत दोघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार सुखराज रामचरण यादव (ब. नं. 711) हे पोलीस शिपाई सौरभ कुलथे (ब. नं. 1053) यांच्यासह वरोरा पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 29 मे ला अवैध दारू, जुगार व गांजा विक्री करणाऱ्यांविरुद्ध पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान, गोपनीय माहितीदाराकडून मौजा बोर्डा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ‘यश पान सेंटर’ येथे कल्याण, मिलन व राजधानी सट्टा नावाचा जुगार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांना सोबत घेऊन घटनास्थळी धाड टाकली. पोलिसांची चाहूल लागताच काही लोक घटनास्थळावरून पळून गेले. मात्र, पोलिसांनी पांढरा शर्ट व गळ्यात पांढरा दुपट्टा घातलेल्या एका व्यक्तीस ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव दशरथ उद्धवराव हरणे (वय 65, रा. नंदोरी, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर) असे सांगितले.

त्याच्या झडतीमध्ये 1 हजार 980 रुपये रोख रक्कम, कल्याण सट्ट्याचे आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या व एक बॉलपेन असा एकूण 1 हजार 985 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील चौकशीत संबंधित सट्टापट्टी व्यवसाय हा महादेव गजानन मारवडे (वय 47, रा. हनुमान वॉर्ड, वरोरा) यांच्या मालकीच्या दुकानात सुरू असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी महादेव मारवडे यालाही ताब्यात घेतले.

सदर प्रकरणी आरोपी दशरथ उद्धवराव हरणे व महादेव गजानन मारवडे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वरोरा पोलीस स्टेशन करीत आहे.

Comments