वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

माजरीत मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाडसट्टापट्टी साहित्य व रोख रकमेसह आरोपी ताब्यात; महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल

माजरीत मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड
सट्टापट्टी साहित्य व रोख रकमेसह आरोपी ताब्यात; महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल

माजरी : माजरी पोलिसांनी मटका जुगाराविरोधात कारवाई करत एका आरोपीला ताब्यात घेतले असून रोख रक्कम व सट्टापट्टी साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई 15 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी करण्यात आली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक मनोहर दडमल हे पोलीस पथकासह माजरी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, मुखबिरामार्फत माहिती मिळाली की बंद पडलेल्या आंबेडकर शाळेजवळील चर्च परिसरात एक इसम लोकांकडून पैसे घेऊन सट्टापट्टी व मटका जुगार चालवत आहे.
माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमक्ष सायंकाळी सुमारे 5.15 वाजता धाड टाकली. पोलिसांची चाहूल लागताच सट्टापट्टीवर आकडे लावणारे काही जण घटनास्थळावरून पसार झाले. मात्र, सट्टा स्वीकारणारा इसम पोलिसांच्या ताब्यात आला.
ताब्यात घेतलेल्या व्यक्तीने आपले नाव विजय दादाजी नक्षिणे (वय 63), रा. पाटाळा, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून 2 हजार रुपये रोख, एक पेन व सट्टापट्टीचे आकडे लिहिलेली कागदी चिट्टी असा एकूण 2 हजार 5 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये कलम 12 (अ) अंतर्गत माजरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार करीत आहेत.

Comments