वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

खांबाडा येथे ५ लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; एक आरोपी अटकेत, दोघे फरार

खांबाडा येथे ५ लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; एक आरोपी अटकेत, दोघे फरार

वरोरा : खांबाडा येथे स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने मोठी कारवाई करत ५ लाख रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त केले. या कारवाईत एका युवकाला अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पोलीस स्टेशन वरोरा हद्दीतील मौजा खांबाडा येथे सापळा रचण्यात आला. यावेळी संशयित युवकाची झडती घेतली असता त्याच्याकडून १०१ ग्रॅम एमडी ड्रग्ज पावडर आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची अंदाजे किंमत ५ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपीकडून एक मोबाईल फोन तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोपेड असा एकूण ५ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अमित कृष्णा गजभिये (वय २३, रा. इंदोरा, नागपूर) असे आहे. तर या प्रकरणातील फरार आरोपी हर्षल टेंभेकर व सोहेल शेख यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

या प्रकरणी पोलीस स्टेशन वरोरा येथे एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क) व २२(क) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व सायबर पोलिस स्टेशन चंद्रपूरच्या पथकाने संयुक्तपणे पार पाडली.


Comments