वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

सासऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला; आकाश पिट्टलवारविरुद्ध वरोरा पोलिसांत गुन्हा

सासऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला; आकाश पिट्टलवारविरुद्ध वरोरा पोलिसांत गुन्हा

वरोरा : शहरातील सरदार पटेल वार्ड परिसरात किरकोळ वादातून एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली असून या प्रकरणी वरोरा पोलिसांनी आरोपी आकाश पिट्टलवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपाली लक्ष्मण पवार (वय २५, रा. सरदार पटेल वार्ड, वरोरा) यांनी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्या आपल्या पती लक्ष्मण पवार व सासरे दादू किसन पवार यांच्यासह संयुक्त कुटुंबात राहतात.
दि. २२ मे २०२६ रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास दिपाली पवार या घरी असताना त्यांची मावशीची मुलगी कु. अंबिका शेळके हिने येऊन चौकात दादू पवार व आकाश पिट्टलवार यांच्यात भांडण सुरू असल्याची माहिती दिली. त्यानंतर दिपाली पवार या त्यांच्या चुलत सासू शोभा दशरथ मंजुळकर यांच्यासह घटनास्थळी गेल्या.
तेथे आकाश पिट्टलवार हा दादू पवार यांच्याशी वाद घालत असल्याचे दिसून आले. यावेळी आरोपीने जवळील धारदार शस्त्राने दादू पवार यांच्या डाव्या बाजूच्या पोटाजवळ व बगलेच्या भागात वार करून दुखापत केली. तसेच शिवीगाळ करत पुन्हा मारहाण करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेमुळे पवार कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून तक्रारीवरून वरोरा पोलिसांनी आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Comments