वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

सायकलस्वार शेतकऱ्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू; चालक फरार

सायकलस्वार शेतकऱ्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू; चालक फरार
बातमी:
वरोरा : तालुक्यातील बोर्डा–जामगाव मार्गावर शिर नदीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकलस्वार शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ५ मे रोजी दुपारी घडली. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रामकृष्ण विठ्ठुजी जेनेकर (वय ५८), रा. दिंदोडा खुर्द (जामगाव) ता. वरोरा हे ५ मे रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास आपल्या शेतातील आंबे सायकलवर घेऊन वरोरा येथे विक्रीसाठी गेले होते. आंब्यांची विक्री करून परत येत असताना दुपारी अंदाजे ४.०० ते ४.३५ वाजण्याच्या दरम्यान बोर्डा–जामगाव रोडवरील क्वॉलिटी बारसमोर, शिर नदीजवळ अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.
या अपघातात ते गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे हलविले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले.
या प्रकरणी मृताचे चिरंजीव प्रशांत रामकृष्ण जेनेकर (वय २७) यांनी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात वाहन चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडविल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांकडून अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरू असून पुढील तपास करण्यात येत आहे.

Comments