वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

रोटरी क्लब वरोराचा स्तुत्य उपक्रम; वृद्ध व गरजूंंसाठी मोफत नेत्र व दंत तपासणी शिबिर

रोटरी क्लब वरोराचा स्तुत्य उपक्रम; वृद्ध व गरजूंंसाठी मोफत नेत्र व दंत तपासणी शिबिर

वरोरा : समाजाप्रती असलेले आपले उत्तरदायित्व जपत रोटरी क्लब वरोरा यांच्या वतीने गरजू आणि वृद्ध नागरिकांसाठी भव्य मोफत नेत्र व दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. चंदनखेडा येथे ७ मे २०२६ रोजी पार पडलेल्या या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आर्थिक परिस्थितीमुळे अनेक गरजू नागरिकांना योग्य वेळी आरोग्य तपासणी व उपचार घेणे शक्य होत नाही. हीच बाब लक्षात घेऊन रोटरी क्लबने “सेवा हीच आमची ओळख” हे ब्रीद समोर ठेवत सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला. या शिबिरामुळे वृद्ध आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

शिबिरात नेत्र तपासणी अंतर्गत मोतीबिंदू शस्त्रक्रिया तपासणी, चष्म्याचा नंबर तपासणी, तिरळेपणा व काचबिंदू तपासणी तसेच मोफत आय ड्रॉप्सचे वाटप करण्यात आले. दंत तपासणीमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून दातांच्या विविध समस्यांचे निदान करण्यात आले. यासोबतच रक्तदाब आणि मधुमेहाची विनामूल्य तपासणीही करण्यात आली.

विशेष म्हणजे, केवळ १०० रुपयांत दर्जेदार नंबरच्या चष्म्याचे वाटप करून सामान्य नागरिकांना मोठा आधार देण्यात आला. शिबिरात १०० हून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली.

या उपक्रमात प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. निखिल अ. लांबट आणि दंत चिकित्सक डॉ. स्नेहदीप रामटेके यांनी आपली सेवा प्रदान केली.

हे शिबिर सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत डॉ. नितीन रघुनाथ पाटील हॉस्पिटल येथे पार पडले. या उपक्रमासाठी प्रकल्प प्रमुख रोटे. डॉ. निखिल लांबट, रोटरी अध्यक्ष रोटे. योगेश डोंगरवार, सचिव रोटे. राहुल पावडे, पुढील अध्यक्ष अभिजित मणियार तसेच अमित लाहोटी यांनी विशेष परिश्रम घेतले.

“आपले डोळे… आमची जबाबदारी” या भावनेतून आयोजित या शिबिराचा लाभ चंदनखेडा, विसापूर, वायगाव, चरूर, पारोधी, पाचगाव तसेच कोकेवाडा परिसरातील मोठ्या संख्येने गरजू व वृद्ध नागरिकांनी घेतला.




Comments