वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

चरूरखटीत अपघातानंतर संतप्त जमावाचा कन्स्ट्रक्शन कॅम्पवर हल्ला; १४ लाखांची तोडफोड, तिघांवर गुन्हा

चरूरखटीत अपघातानंतर संतप्त जमावाचा कन्स्ट्रक्शन कॅम्पवर हल्ला; १४ लाखांची तोडफोड, तिघांवर गुन्हा

बातमी: चेतन लूतडे 

वरोरा : तालुक्यातील मौजा चरूरखटी येथे १ मे २०२६ रोजी सायंकाळी झालेल्या अपघातानंतर संतप्त झालेल्या काही इसमांनी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कॅम्पमध्ये घुसून तोडफोड व मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात ५ मे २०२६ रोजी रात्री २३:४८ वाजता गुन्हा क्रमांक ०६०० नोंद करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रीकांत तुकाराम टोंगळे (वय २५), रा. चिरकुटा (जि. यवतमाळ) हे श्री जय गिरणारी कन्स्ट्रक्शन कंपनी, चरूरखटी येथे सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत. १ मे रोजी सायंकाळी १९:३० ते २०:३० वाजण्याच्या सुमारास कंपनीच्या कॅम्पसमोर आयशर हायवा (क्र. MH 34 CQ 1484) या वाहनाने एका व्यक्तीस धडक दिल्याने अपघात झाला.
या घटनेनंतर अपघातग्रस्ताचे नातेवाईक व गावकरी मोठ्या संख्येने कॅम्पसमोर जमले. त्यावेळी बंटी कुमरे (रा. नांदरा) हा आपल्या दोन साथीदारांसह कॅम्पमध्ये घुसला. त्याने खुशाल बनसिंगे व विजय मोडक यांना चिथावणी देत “सर्व गाड्यांच्या काचा फोडा” असे सांगितल्याचा आरोप आहे.
यानंतर तिघांनी लाकडी दांडे व दगडांच्या साहाय्याने कॅम्पमधील चार हायवा ट्रक, एक ग्रेडर व एक पोकलॅन्ड मशीनची काच, हेडलाईट व इतर साहित्याची तोडफोड केली. अपघातग्रस्त हायवा वाहनाचेही नुकसान करण्यात आले. तसेच कॅम्पमधील कुलर व खुर्च्यांचीही नासधूस करण्यात आली. या संपूर्ण घटनेत सुमारे १४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, तोडफोड थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आरोपींनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. भीतीमुळे फिर्यादी घटनास्थळावरून निघून गेले असल्याचेही सांगण्यात आले.
या प्रकरणी आरोपी बंटी कुमरे, खुशाल बनसिंगे व विजय मोडक यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 115(2), 324(5), 49, 351(3) व 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरोरा पोलीस करत आहेत.

Comments