वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

माढेळी येथे युवकावर काचेच्या बाटलीने हल्लाजुन्या वादातून मारहाण; वरोरा पोलिसांत गुन्हा दाखल

माढेळी येथे युवकावर काचेच्या बाटलीने हल्ला
जुन्या वादातून मारहाण; वरोरा पोलिसांत गुन्हा दाखल
वरोरा, दि. 13 मे 2026 :

माढेळी येथे जुन्या हसी-मजाकच्या वादातून एका युवकावर थम्सअपच्या काचेच्या बाटलीने हल्ला करून गंभीर मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयुर शंकर ढोरे (वय 26, रा. माढेळी, ता. वरोरा) हा आपल्या मित्र सुरज देवतळे याच्यासह मोटारसायकलने पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोलपंपावर गेला होता. मात्र तेथे मोठी गर्दी असल्याने दोघेही परत येत होते. दरम्यान, शेतकरी भवन परिसरात उमेश कोहपरे यांच्या पानठेल्याजवळ ते थांबले असता तेथे संतोष मेश्राम व शुभम उर्फ शिवम येटे हे उपस्थित होते. दोघेही मद्यधुंद अवस्थेत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
यावेळी शुभम येटे याने वर्षभरापूर्वी झालेल्या हसी-मजाकचा राग मनात धरून “तुच आहे ना माझी मजाक घेणारा” असे म्हणत मयुर ढोरे याला शिवीगाळ केली व थपडा मारल्या. त्यानंतर त्याने थम्सअपच्या काचेच्या बाटलीने मयुरच्या डोक्यावर वार केला. जीव वाचवण्यासाठी मयुर पळत असताना तो खाली पडला. त्यावेळी आरोपीने पुन्हा डोक्यावर बाटलीने हल्ला करून मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या मारहाणीत मयुर ढोरे याच्या डोक्याला, डाव्या हाताला तसेच दोन्ही पायांच्या घोट्यांना दुखापत झाली. घटनेवेळी सुरज देवतळे हा प्रत्यक्षदर्शी म्हणून उपस्थित होता.
या प्रकरणी वरोरा पोलीसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम  118(1), 351(2), 352  अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


Comments