वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

वरोरात सट्टापट्टीवर पोलिसांचा छापा; आरोपीकडून रोख रकमेसह मुद्देमाल जप्त

वरोरात सट्टापट्टीवर पोलिसांचा छापा; आरोपीकडून रोख रकमेसह मुद्देमाल जप्त

वरोरा :27/5/26 वरोरा पोलिसांनी शहरातील मालवीय वार्ड परिसरात सुरू असलेल्या कल्याण सट्टापट्टी जुगारावर छापा टाकून एका आरोपीला ताब्यात घेतले. ही कारवाई रविवारी (दि. 25 मे) सायंकाळी करण्यात आली.

पोलीस हवालदार संदिप मुळे व त्यांच्या पथकाला पेट्रोलिंगदरम्यान मुखबिरामार्फत माहिती मिळाली की, मालवीय वार्ड येथील तेजस सलून दुकानासमोरील चौकात एक इसम पैसे घेऊन हारजितचा कल्याण सट्टापट्टी जुगार चालवत आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी धाड टाकली.

यावेळी आरोपी आकाश कैलास फाले (वय 28, रा. आंबादेवी वार्ड, वरोरा) हा लोकांकडून पैसे स्वीकारून सट्टापट्टी आकडे लिहिताना आढळून आला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता सट्टापट्टीचे आकडे लिहिलेली चिठ्ठी, निळ्या रंगाचा बॉलपेन आणि 1 हजार 350 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 1 हजार 355 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 12 (अ) अन्वये वरोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.



Comments