वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

घरकुल बांधकामाच्या साहित्यावरून वाद; महिलेला मारहाणशिवीगाळ व धक्काबुक्की प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

घरकुल बांधकामाच्या साहित्यावरून वाद; महिलेला मारहाण

शिवीगाळ व धक्काबुक्की प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

शेगांव बु.

वरोरा तालुक्यातील चारगाव (खु.) येथे घरकुल बांधकामासाठी टाकलेल्या रेती व गिट्टीवरून झालेल्या वादातून महिलेला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी शेगाव (बु.) पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वर्षा संजय कष्टी (वय 35) या आपल्या पती व मुलांसह चारगाव (खु.) येथे वास्तव्यास असून मजुरीचे काम करतात. त्यांचे घरकुल मंजूर झाल्याने बांधकामासाठी लागणारी रेती व गिट्टी घरासमोर टाकण्यात आली होती.

दि. 15 मे 2026 रोजी सकाळी सुमारे 9.45 वाजताच्या सुमारास वर्षा कष्टी या घरकुलाच्या जोत्याला पाणी मारत असताना शेजारी राहणारे लक्ष्मण कष्टी व त्यांचा मुलगा गणेश लक्ष्मण कष्टी यांनी रेती व गिट्टीमुळे ये-जा करण्यास अडथळा होत असल्याच्या कारणावरून वाद घातला. यावेळी फिर्यादीने वादाचे कारण विचारले असता आरोपींनी अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर गणेश कष्टी याने फिर्यादीच्या गालावर थप्पड मारून धक्काबुक्की केली. त्यामुळे त्या नालीजवळ पडल्याने त्यांच्या डोक्याला व नाकाला दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी शेगाव (बु.) पोलिसांनी आरोपी लक्ष्मण कष्टी व गणेश लक्ष्मण कष्टी, रा. चारगाव (खु.) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 296, 115(2), 352, 351(2) व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

.........................


Comments