वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

भरधाव ट्रॅव्हल्स बसची म्हशींना धडक; शेतकऱ्याचे ९ लाखांपर्यंत नुकसान

भरधाव ट्रॅव्हल्स बसची म्हशींना धडक; शेतकऱ्याचे ९ लाखांपर्यंत नुकसान

वरोरा : टेमुर्डा येथील शेतकरी अतुल सुरेशराव भोंग यांच्या म्हशींना भरधाव ट्रॅव्हल्स बसने धडक दिल्याने दोन म्हशी जागीच ठार तर एक म्हैस गंभीर जखमी झाल्याची घटना 18 मे रोजी सायंकाळी नागपूर-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावर आदर्श जिनिंगसमोर घडली. या घटनेत शेतकऱ्याचे सुमारे 8 ते 9 लाख रुपयांपर्यंत नुकसान झाल्याची तक्रार वरोरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अतुल भोंग (वय 38, रा. टेमुर्डा, ता. वरोरा) हे शेतीसोबत दुग्ध व्यवसाय करतात. त्यांच्या जवळ चार म्हशी व सात गाई असून ते नेहमीप्रमाणे जनावरे चारून गावाकडे परत आणत होते. दरम्यान, नागपूर-चंद्रपूर हायवेवर जनावरे रस्ता ओलांडत असताना MH-34-BH-5677 क्रमांकाच्या DNR ट्रॅव्हल्स बसने भरधाव वेगात येत निष्काळजीपणे धडक दिली.
या अपघातात 10 लिटर दूध देणारी एक म्हैस आणि गाभण असलेली दुसरी म्हैस जागीच मृत्युमुखी पडली, तर 14 लिटर दूध देणाऱ्या आणखी एका म्हशीचा पाय व जबडा गंभीर जखमी झाला. मृत व जखमी म्हशींची किंमत सुमारे 3 लाख रुपये असून, भविष्यातील दुग्ध उत्पन्नासह एकूण 8 ते 9 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी वरोरा पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुमित्रा साखरकर करीत आहेत.

Comments