वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

वरोरा पोलिसांची कारवाई : अवैध देशी दारूसह युवक ताब्यात

वरोरा पोलिसांची कारवाई : अवैध देशी दारूसह युवक ताब्यात

वरोरा : सरदार पटेल वॉर्ड परिसरात अवैधरित्या देशी दारू विक्री करणाऱ्या एका युवकावर वरोरा पोलिसांनी कारवाई करत त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.२२ मे) रात्री करण्यात आली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार संदीप मुळे हे पोलीस स्टाफसह पेट्रोलिंग करत असताना मुखबिरामार्फत माहिती मिळाली की, सरदार पटेल वॉर्ड येथे प्रविण महादेव गायकवाड (वय ३५) हा घरासमोर अवैधरित्या देशी दारूची विक्री करत आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांना सोबत घेऊन छापा टाकला.
यावेळी आरोपीकडून “रॉकेट देशी दारू संत्रा” नावाच्या ९० मि.ली.च्या १९ बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ७६० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीकडे दारू विक्रीचा कोणताही परवाना आढळून आला नाही. 
सदर प्रकरणी प्रविण गायकवाड याच्याविरुद्ध कलम ६५ (ई) महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून ही दारू कोणत्या दुकानदाराने विना लायसन या इसमास विकत दिली  याचा  पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.
.....

Comments