वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

भीषण अपघातात एक महिला कामगार ठार, तिघे जखमी; बेजबाबदारपणाचा आरोप

भीषण अपघातात एक महिला कामगार ठार, तिघे जखमी; बेजबाबदारपणाचा आरोप

वरोरा (जि. चंद्रपूर) – नागपूर येथील ठेकेदार सुरज हिंगे याच्या बेजबाबदारपणामुळे झालेल्या भीषण अपघातात एका महिला कामगाराचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. वरोरा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, मध्यप्रदेशातील धानोरा (जि. शिवनी) येथील रहिवासी मजूर यांनी २१ मे २०२६ रोजी ही तक्रार दाखल केली.

तक्रारीत म्हटले आहे की, दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी ठेकेदार सुरज हिंगे याने आपल्या लाल रंगाच्या आयसर गाडी (क्र. MH 27 BX 8406) मध्ये सिमेंटचे गट्टू भरून चंद्रपूरला नेण्यास सांगितले. त्याने मजुरांना गट्टूंवरच गाडीच्या टाळ्यात (मागील भागात) बसण्यास सांगितले. नागपूरहून चंद्रपूरकडे जाताना सुरज हिंगेने स्वतःच गाडी वेगाने, आडवा-तिडवा आणि धोकादायक पद्धतीने चालवली. तसेच मागील बाजूस जुना, झिजलेला टायर लावल्याने टेमुर्डा गावानंतर (मामा धाब्याजवळ) दुपारी ४ वाजता टायर फुटला. त्यामुळे गाडीचा नियंत्रण सुटला व गाडी उलटली.

या अपघातात सविता सुमन कोरेटी हिच्या डोक्याला गंभीर मार लागून ती जागीच बेशुद्ध पडली. अंजली संदीप उईके व दसियाबाई चंद्रघोष उईके यांच्या दोन पायांना व कंबरेला मार लागला तर तक्रारदार यांच्या डोक्याला व उजव्या हाताला जखमा झाल्या. सुरज हिंगेने सर्व जखमींना वरोरा येथील सरकारी रुग्णालयात नेले. पुढे सविता कोरेटीची प्रकृती बिघडल्याने तिला चंद्रपूर येथील कोल सिटी हॉस्पिटल व तेथून नागपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२ वाजता तिचा मृत्यू झाला. तक्रारदार व इतर दोन जखमींवर नागपूर येथील शुअरटेक हॉस्पिटलमध्ये उपचार झाले.

तक्रारदाराने मृतिकेचे कारण ठेकेदार सुरज हिंगेची लापरवाही, प्रचंड वेग, जुना टायर वापरणे व मजुरांना अयोग्य पद्धतीने बसविणे सांगितले आहे. वरोरा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
.......

Comments