वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

नागरी येथे अवैध रेती वाहतुकीवर वरोरा पोलिसांची कारवाईट्रॅक्टरसह ५ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; चालक फरार

नागरी येथे अवैध रेती वाहतुकीवर वरोरा पोलिसांची कारवाई
ट्रॅक्टरसह ५ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; चालक फरार

वरोरा- चेतन लूतडे -16/5/26

वरोरा : पोत्रा नदी पात्रातून अवैधरित्या रेतीची चोरी करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर वरोरा पोलिसांनी धडक कारवाई करत ट्रॅक्टरसह अंदाजे ५ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई १५ मे रोजी दुपारी नागरी गाव परिसरात करण्यात आली.
पोलीस स्टेशन वरोरा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद श्याम भस्मे हे पोलीस अमलदार विशाल राजुरकर यांच्यासह गस्त घालत असताना गुप्त माहिती मिळाली की, एक लाल रंगाचा ट्रॅक्टर पोत्रा नदी पात्रातून विनापरवाना रेतीची चोरी करून नागरी गावाच्या दिशेने येत आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी सापळा रचला.
पोत्रा नदी पात्रात पोलिसांना लाल रंगाचा ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३२ पी ०५४५ हा ट्रॉलीत रेती भरून येताना दिसला. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालक पोलिसांना पाहून ट्रॅक्टर सोडून घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी पाठलाग केला मात्र चालक हाती लागला नाही.
यानंतर पंचासमक्ष करण्यात आलेल्या पाहणीत ट्रॉलीमध्ये अंदाजे १ ब्रास रेती आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या रेतीची किंमत सुमारे ५ हजार रुपये तर ट्रॅक्टरची किंमत ५ लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी एकूण ५ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
या प्रकरणी ट्रॅक्टर चालक व मालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम ४८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.

Comments