वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

यात्रा वार्ड परिसरात आगीने महिलेचे दुकानाला आग; अग्निशामक दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

यात्रा वार्ड परिसरात आगीने महिलेचे दुकानाला आग; अग्निशामक दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

वरोरा, २८ मे २०२६ – वरोरा शहरातील प्रभाग क्रमांक ७ अंतर्गत येणाऱ्या ‘यात्रा वार्ड’ परिसरात एका महिलेच्या दुकानाला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत दुकानाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

ही घटना २८ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजता घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सदर दुकान सविता एकरे (रा. नंदोरी) यांच्या मालकीचे आहे. अचानक दुकानातून धूर निघत असल्याचे पाहून परिसरात खळबळ उडाली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले.

घटनेची माहिती मिळताच वरोरा नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या जवानांनी अत्यंत कौशल्याने व जिद्दीने कामगिरी करत काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविले. जवानांच्या या तत्परतेमुळे आग आजूबाजूच्या दुकानांना किंवा घरांना लागण्यापासून वाचली आणि मोठा अनर्थ टळला.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. वरोरा नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या या आक्रमक कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments