वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

वरोरा पोलिसांची कारवाई : अवैध देशी दारूसह मजुराला अटक

वरोरा पोलिसांची कारवाई : अवैध देशी दारूसह मजुराला अटक

15 नग सीलबंद देशी दारूच्या बॉटला जप्त. 

बातमी: चेतन लूतडे 

चंद्रपुर, दि. 15 मे 2026 – वरोरा पोलीस स्टेशनच्या पथकाने टेमुर्डा बिट परिसरात प्रोव्ही रेड व पेट्रोलिंग दरम्यान मुखबीराच्या माहितीवरून पिंपळगाव (मा) येथे छापा टाकून अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या एका आरोपीला अटक केली. त्याच्याकडून 15 नग कंपनी सिलबंद देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.

पोलीस हवालदार विक्की करपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पथकाने गावातील दोन स्थानिक पंच व पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत आरोपी अशोक किसनाजी जिवतोडे (वय 51, धंदा-मजुरी, रा. पिंपळगाव (मा), ता. वरोरा) याच्या घराची तपासणी केली. त्याच्या घरामागील संडासच्या भिंतीजवळ एका पांढऱ्या प्लास्टिक पिशवीत 90 एम.एल.च्या 15 बाटल्या (रॉकेट देशी दारू) आढळून आल्या. एक बाटली तपासणीसाठी सील करण्यात आली.

आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम 65(ई) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. 
................................

वरोरा : पानठेल्यात अवैध दारू विक्री, 25 बाटल्यांसह तरुणाला अटक

बातमी (दि. 16 मे 2026):
वरोरा पोलिसांनी टेमुर्डा (हुडकी) परिसरातील एका पानठेल्यावर छापा टाकून अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या आरोपीला अटक केली. पोलीस हवालदार विक्की करपे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पथक पेट्रोलिंग करत असताना मुखबीराने माहिती दिली की, शब्बु अफजल शेख (वय 25) हा आपल्या पानठेल्यात दारू बाळगून विक्री करतो.

पोलिसांनी पंच व अन्य स्टाफसह पानठेल्यात जाऊन झडती घेतली. तेथील एका कोपऱ्यात पिवळ्या-लाल रंगाच्या प्लास्टिक पिशवीत 25 नग देशी दारूच्या सिलबंद बाटल्या (प्रत्येकी 90 एम.एल., रॉकेट संत्रा कंपनी) आढळल्या. एकूण दारूची किंमत सुमारे 1000 रुपये इतकी आहे. आरोपीकडे परवाना नसल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी एक बाटली तपासणीसाठी सील करून उर्वरित मुद्देमाल जप्त केला.

आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम 65(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई दि. 15 मे 2026 रोजी संध्याकाळी 6.15 ते 6.45 वाजेदरम्यान पूर्ण करण्यात आली.

विना लायसन धारकांना दारू सर्रासपणे किरकोळ विक्रीसाठी शहरात व खेड्यात मिळत आहे. या विक्रेत्यांवर दुकानदारावर कारवाई कधी होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
............

Comments