वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

वरोऱ्यात सट्टापट्टीवर पोलिसांची धाड; युवक ताब्यात, रोख रकमेसह साहित्य जप्त

वरोऱ्यात सट्टापट्टीवर पोलिसांची धाड; युवक ताब्यात, रोख रकमेसह साहित्य जप्त
बातमी: वरोरा 
वरोरा : शहरातील आझाद वॉर्ड परिसरात सुरू असलेल्या कल्याण सट्टा-पट्टी जुगारावर वरोरा पोलिसांनी धाड टाकून एका युवकाला ताब्यात घेतले. ही कारवाई 28 मे 2026 रोजी सायंकाळी करण्यात आली.
पोलीस हवालदार संदीप मुळे, पोलीस अंमलदार विशाल राजुरकर व मनोज ठाकरे हे जुगार, दारू व अवैध धंद्यांवर कारवाईसाठी पेट्रोलिंग करत असताना मुखबिराकडून माहिती मिळाली की, आझाद वॉर्ड येथील सार्वजनिक रोडवर एक इसम लोकांकडून पैसे घेऊन कल्याण सट्टा-पट्टी जुगार चालवत आहे.
माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी धाड टाकली. पोलिसांना पाहताच काही जुगारी घटनास्थळावरून पसार झाले. मात्र सट्टा स्वीकारणारा इसम पोलिसांच्या ताब्यात आला. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव गजेंद्र विनोद वनकर (वय 21, रा. चिरघर प्लांट, वरोरा) असे सांगितले.
पोलिसांनी त्याची झडती घेतली असता कल्याण सट्टा-पट्टी लिहिलेला कागद, दोन निळ्या रंगाचे बॉलपेन व रोख 1100 रुपये असा एकूण 1110 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. घटनास्थळी पंचनामा करून संपूर्ण साहित्य ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी आरोपी गजेंद्र वनकर याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये कलम 12 (अ) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून यामागे किती व्यक्ती काम करीत आहे. मुख्य सूत्रधार कोण? या सगळ्यांची चौकशी होऊन कारवाई करण्याची गरज आहे. पुढील  तपास वरोरा पोलीस करीत आहेत.

Comments