वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

मजरा रै येथे अवैध देशी दारू विक्रीवर पोलिसांची धाड; पानठेल्यातून दारूसाठा जप्त.

मजरा रै येथे अवैध देशी दारू विक्रीवर पोलिसांची धाड; पानठेल्यातून दारूसाठा जप्त.

वरोरा : वरोरा पोलिसांनी अवैध दारू विक्रीविरोधात कारवाई करत मजरा रै परिसरातील एका पानठेल्यावर धाड टाकून देशी दारूचा साठा जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि. 26 मे) सायंकाळी करण्यात आली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन वरोरा येथील पोलीस शिपाई महेश गुलाबराव गावतुरे हे पोलीस कर्मचारी व पंचांसह अवैध दारू विक्री, जुगार व गांजाविरोधात पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, मुखबिरामार्फत माहिती मिळाली की, मजरा रै येथील चंद्रपूर-नागपूर महामार्गालगत राजेंद्र गमभिराजी ताकसांडे (वय 55) हा आपल्या पानठेल्यात अवैधरित्या देशी दारू विक्री करत आहे.
माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी धाड टाकली. पोलिसांना पाहताच ठिकाणी जमलेली गर्दी पसार झाली. त्यानंतर पानठेल्याची झडती घेतली असता एका कापडी पिशवीत 90 एमएलच्या राकेट देशी दारूच्या 14 बाटल्या आढळून आल्या. प्रत्येकी 40 रुपये किमतीच्या या बाटल्यांची एकूण किंमत 560 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दारू बाळगण्याचा परवाना विचारला असता आरोपीकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी पंचासमक्ष एक बाटली नमुना म्हणून सील करून उर्वरित मुद्देमाल जप्त केला. घटनास्थळ पंचनामा करून आरोपीस ताब्यात घेण्यात आले. ह्या बॉटल कोणत्या दुकानातून विकत घेतल्या याचा तपास पोलीस करीत आहे.
या प्रकरणी आरोपी राजेंद्र गमभिराजी ताकसांडे, रा. मजरा रै ता. वरोरा जि. चंद्रपूर याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.

Comments