वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

वरोऱ्यात अवैध दारू वाहतूक उघड; स्कुटीसह ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त, आरोपीवर गुन्हावरोरा शहरात दारू दुकानातून विना लायसन धारकांना दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू . राज्य उत्पादन विभागाचे दुर्लक्ष.

वरोऱ्यात अवैध दारू वाहतूक उघड; स्कुटीसह ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त, आरोपीवर गुन्हा

वरोरा शहरात दारू दुकानातून विना लायसन धारकांना दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू . राज्य उत्पादन  विभागाचे दुर्लक्ष. 

बातमी: चेतन लूतडे 6/5/26

वरोरा : शहरात अवैध दारू वाहतूक करणाऱ्या एका इसमावर वरोरा पोलिसांनी कारवाई करत देशी व विदेशी दारूसह स्कुटी असा एकूण ५९,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ५ मे २०२६ रोजी दुपारी करण्यात आली असून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार सुखराज यादव व पोलीस कर्मचारी अमोल नवघरे हे वरोरा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना मुखबिराकडून माहिती मिळाली की, एक इसम काळ्या रंगाच्या मोपेडवरून अवैध दारू वाहतूक करत चिमूरकडे जाणार आहे.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह आनंदवन चौकाजवळ सापळा रचला. दुपारी सुमारे १:०५ वाजता संशयित इसम मोपेडवरून येताना दिसला. त्याला थांबवून चौकशी केली असता त्याने आपले नाव रूपेश पांडुरंग पचारे (वय ४३, रा. वडाळा पैकु, राजीव गांधी नगर, ता. चिमूर) असे सांगितले.
पंचांसमक्ष त्याच्या चेतक कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कुटी (क्र. MH 34 CP 5412) ची तपासणी केली असता डिकीत देशी व विदेशी दारू आढळून आली. यामध्ये ५० नग देशी संत्रा दारू (९० मि.ली.) व ८ नग ‘मास्टर डिलाईट’ व्हिस्की (१८० मि.ली.) असा एकूण सुमारे ३,२०० रुपयांचा दारूसाठा मिळाला. तसेच गुन्ह्यात वापरलेली स्कुटी किंमत ५६,००० रुपये असा एकूण ५९,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर दारू वाहतुकीबाबत कोणताही परवाना नसल्याचे आरोपीने सांगितले. मात्र ही दारू कोणत्या दुकानातून विकत घेतली आहे हे मात्र सांगितले नाही. पोलिसांनी नमुने सील करून पंचनामा केला व आरोपीला ताब्यात घेतले.
या प्रकरणी आरोपी रूपेश पचारे याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वरोरा पोलीस करत आहेत. 

बरेच दिवसापासून पोलीस विभाग अवैध दारू विक्री करणाऱ्या इसमांवर बरीच कारवाई करीत आहे . मात्र राज्य उत्पादन विभाग अजूनही विना लायसन धारकांना मोठ्या प्रमाणात ज्या दुकानातून दारू खरेदी होत आहे अशां दुकानावर कारवाई का केली जात नाही याचा प्रश्न विचारल्या जात आहे. 

Comments