वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

स्वस्त दारू विक्रीच्या वादातून युवकावर चाकू हल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा

स्वस्त दारू विक्रीच्या वादातून युवकावर चाकू हल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा

भद्रावती : गावात स्वस्त दरात दारू विक्री करण्याच्या वादातून एका २२ वर्षीय युवकावर चाकूने हल्ला केल्याची घटना भद्रावती तालुक्यातील मांगली येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदीत्य धनराज कांबळे (वय २२, रा. मांगली, ता. भद्रावती) हा मजुरीचे काम करतो. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, तो पूर्वी मांगली गावात दारू विक्री करीत होता. त्याच गावातील धिरज वरारकर हाही दारू विक्री करत असल्याने दोघांमध्ये पूर्वीपासून वाद सुरू होता. दोन महिन्यांपूर्वीही धिरज वरारकर विरोधात शिवीगाळ व मारहाणीची तक्रार देण्यात आली होती.
दि. २७ मे २०२६ रोजी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास आदीत्य कांबळे हा पिर्ली रोडने फिरायला जात असताना विवेकानंद शाळेजवळ दोन दुचाकींवरून आलेल्या धिरज वरारकर, सुरज परसुटकर, आकाश पाटील, सुरज वरारकर व शकर पाटील यांनी त्याला अडवले. “तू गावात स्वस्त दरात दारू का विकतोस” असा जाब विचारत आरोपींनी शिवीगाळ करत मारहाण केली.
यावेळी मुख्य आरोपी धिरज वरारकर याने जवळील चाकूने चेहऱ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र फिर्यादीने हात आडवा केल्याने डाव्या हाताच्या पंजावर चाकू लागून दुखापत झाली. तसेच इतर आरोपींनी हाताबुक्यांनी मारहाण करून जखमी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेनंतर आरोपींनी पुन्हा स्वस्त दारू विकल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी भद्रावती पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Comments