वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

वरोरातील दोन मतदान अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे; मॅपिंगच्या कामात हलगर्जीपणा

वरोरातील दोन मतदान अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे; मॅपिंगच्या कामात हलगर्जीपणा

वरोरा, दि. २३ – निवडणूक प्रक्रियेतील मतदार यादीचे मॅपिंग व प्रोजेनी मॅपिंगचे काम विहित वेळेत न केल्याप्रकरणी वरोरा तालुक्यातील दोन मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधित्व अधिनियमाअंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नायब तहसीलदार (निवडणूक) शरद पुंडलीकराव मसराम यांनी उपविभागीय अधिकारी वरोरा यांच्या आदेशानुसार ही तक्रार पोलीस स्टेशन वरोरा येथे दाखल केली.

पहिला अधिकारी : मोरेश्वर लक्ष्मण सातपुते (केंद्र क्र. १८८)

नगर परिषद वरोरा येथील लिपीक तथा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मोरेश्वर सातपुते यांना मतदान केंद्र क्र. १८८ साठी मॅपिंगचे काम देण्यात आले होते. २४ मार्च ते १५ मे दरम्यान कामात प्रगती न केल्याने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली; मात्र त्यांनी उत्तर दिले नाही. १८ मे रोजी झालेल्या आढावा बैठकीत ते गैरहजर होते.

दुसरा अधिकारी : सुरेश जनार्दन मसराम (केंद्र क्र. १६७)

हिरालाल लोया विद्यालयातील शिक्षक तथा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सुरेश मसराम यांनाही मतदान केंद्र क्र. १६७ चे मॅपिंगचे काम देण्यात आले होते. त्यांनीही विहित कालावधीत काम पूर्ण केले नाही. कारणे दाखवा नोटीस असतानाही उत्तर दिले नाही. १८ मे च्या बैठकीत ते अनुपस्थित राहिले.

दोन्ही अधिकाऱ्यांनी वारंवार सूचना देऊनही एसआयआरच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याने ७५ - वरोरा विधानसभा मतदारसंघाची प्रतिमा मलीन झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्यावर लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० चे कलम ३२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

---
.  Happy Birthday 🎂 Samirbhau Barai and Dr.Rahul Dhande

Comments