वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

वरोरा पोलिसांची कारवाई : अवैध देशी दारूसह पानठेला चालकावर गुन्हा

वरोरा पोलिसांची कारवाई : अवैध देशी दारूसह पानठेला चालकावर गुन्हा
वरोरा 
टेमुर्डा (हुडकी) येथे ११२० रुपयांचा देशी दारूचा साठा जप्त
वरोरा : वरोरा पोलिसांनी अवैध दारू विक्रीविरोधात कारवाई करत टेमुर्डा (हुडकी) येथील एका पानठेल्यावर छापा टाकून देशी दारूचा साठा जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि. 19 मे 2026) सायंकाळी करण्यात आली.
पोलीस अंमलदार विशाल अरुण राजुरकर व पोलीस हवालदार संदीप मुळे हे प्रोव्हिबिशन व जुगार रेड कामी पेट्रोलिंग करत असताना मुखबिरामार्फत माहिती मिळाली की, टेमुर्डा (हुडकी) येथील पिजदुरा रोडलगत असलेल्या पानठेल्यावर एक इसम अवैधरित्या देशी दारूची विक्री करीत आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी धाड टाकली. यावेळी मारोती गंगाराम येमडवार (वय 60, रा. टेमुर्डा हुडकी, ता. वरोरा) हा पानठेल्यावर आढळून आला. पोलिसांनी पंचासमक्ष झडती घेतली असता काउंटरखाली ठेवलेल्या कापडी पिशवीतून रॉकेट संत्रा कंपनीच्या 28 सिलबंद देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. प्रत्येकी 90 एमएलच्या या बाटल्यांची किंमत सुमारे 1120 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदर दारूबाबत कोणताही परवाना नसल्याचे आरोपीने कबूल केल्याने पोलिसांनी दारू जप्त करून नमुना सील केला. आरोपी वयोवृद्ध असल्याने त्यास जागेवरच नोटीस देऊन सोडण्यात आले.
या प्रकरणी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Comments