वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

वरोरा उड्डाणपुलाच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘क्रांतिवीर शहीद बाबुराव पू. शेडमाके’ नाव देण्याची मागणी

उड्डाणपुलावरील शहीद बाबुराव शेडमाके यांचा फलक हटवल्याने संताप; आदिवासी संघटनांचे आंदोलन
वरोरा उड्डाणपुलाला ‘क्रांतिवीर शहीद बाबुराव पू. शेडमाके’ नाव देण्याची मागणी तीव्र
वरोरा :
वरोरा येथील नागपूर–चंद्रपूर मार्गावरील उड्डाणपुलाच्या मुख्य प्रवेशद्वाराला “क्रांतिवीर शहीद बाबुराव पू. शेडमाके” यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी आदिवासी समाजाच्या वतीने पुन्हा जोर धरू लागली आहे. या संदर्भात तालुका अध्यक्ष आनंद वामनराव गेडाम यांनी ROB इन्फ्रास्ट्रक्चर MSRDC चे अधिकारी रोहन राजदिप यांना निवेदन सादर केले होते.
दि. २१ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या नगर परिषद वरोराच्या विशेष सभेतील ठराव क्रमांक १४ नुसार उड्डाणपुलाला क्रांतिवीर शहीद बाबुराव पू. शेडमाके यांचे नाव देण्यास मान्यता देण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. समाज बांधवांनी याबाबत लेखी अर्ज सादर करून मागणी केली होती.

मात्र, त्यानंतर दिशादर्शक फलकावरून क्रांतिवीर शहीद बाबुराव शेडमाके यांचे बॅनर काढण्यात आल्याने आदिवासी समाजात संतापाची लाट उसळली. समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत शुक्रवारी दुपारी आनंद गेडाम यांनी रत्नमाला चौकातील दिशादर्शक कमानीवर चढून निषेध आंदोलन केले. यावेळी आदिवासी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून युवकास खाली उतरवले तसेच पूर्ववत बॅनर लावण्याबाबत आश्वासन दिले.
“वीर बाबुराव शेडमाके यांचा अपमान सहन केला जाणार नाही,” अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेत प्रशासनाकडे तातडीने स्पष्टीकरणाची मागणी केली. परिस्थिती लक्षात घेता पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढविला असून, जोपर्यंत नामफलक सन्मानाने पुन्हा लावला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष घनश्याम मडावी, विदर्भ अध्यक्ष सूर्यकांत उईके, जिल्हा अध्यक्ष कृष्णा मसराम, विदर्भ महासचिव दिनेश शेराम, विदर्भ उपाध्यक्ष प्रमोद बोटीकर, विदर्भ कोषाध्यक्ष कृष्णाराव परतेकी, यांच्या मार्गदर्शनाखाली महिला जिल्हा अध्यक्ष माया पेंदोर , विलासभाऊ परचाके, सिंगल दीप पेंदाम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
......
.................

Comments